कोकण

चिपळूणात सामाजिक सलोखा समितीची बैठक

CD

अमली पदार्थ विक्रेत्यांची माहिती द्या
राजेंद्रकुमार राजमाने ः चिपळुणात सामाजिक सलोखा समिती
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ३१ ः गावात अमली पदार्थविरोधी मोहिमेंतर्गत नशापान व अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर लक्ष ठेवून त्याची माहिती पोलिसांना द्यावी. खात्री केल्याशिवाय कोणीही कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, अफवांची खातरजमा करावी, असे आवाहन सामाजिक सलोखा समिती बैठकीत उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांनी केले.
जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या सूचनेनुसार, चिपळूण पोलिस ठाण्यात सामाजिक सलोखा समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीची बैठक उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत सदस्यांना काही सूचना देण्यात आल्या. त्यानुसार सर्व धार्मिक सण, उत्सवाचे कोणत्याही समस्या असल्यास त्याबाबात पोलिसांना कळवावे, आगामी बकरी ईद सणाच्या अनुषंगाने शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले. गोवंश वाहतूक अथवा गोमांस वाहतूक याबाबत माहिती मिळाल्यास तत्काळ पोलिसांना कळवावे, गोवंश वाहतूक अथवा गोमांस विक्री वाहतूक करताना संशयित आढळून आल्यास त्यांना मारहाण न करता चिपळूण पोलिस ठाण्यात कळवावे. आगामी बकरी ईद सणाच्या अनुषंगाने धार्मिक भावना दुखावतील अथवा सामाजिक तेढ निर्माण होईल, अशी कृती अथवा वक्तव्य करू नये. सोशल मीडियावर कोणतेही आक्षपार्ह विधाने टाकू नयेत. सायबर क्राइमबाबत सतर्क राहावे तसेच ऑनलाईन नवनवीन येणारे क्युआर कोडबाबत सूचना देण्यात आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 Live: यवतमाळमध्ये भाजपला धक्का, नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मोठ्या नेत्याच्या पत्नीचा पराभव

शुभमन गिलसोबत विश्वासघात! T20 World Cup संघातून हाकलल्याचे केव्हा सांगितले? आत्ताची मोठी अपडेट

Nagar Panchayat News Sangli : हाय व्होल्टेज ड्रामा झालेल्या सांगली जिल्ह्यातील आष्टा नगरपरिषदेत कोणाची आली सत्ता, जयंत पाटील गेमचेंजर

Atpadi Nagaradhyaksh Result: आटपाडीत शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक, पण नगराध्यक्षपद भाजपकडे; पडळकरांचा दे धक्का

Latest Marathi News Live Update: आसाममध्ये अमोनिया-युरिया प्रकल्पाचे भूमिपूजन: मोदींची उपस्थिती

SCROLL FOR NEXT