कोकण

लक्ष्मीकेशव विद्यालयात योग दिन

CD

‘लक्ष्मीकेशव’मध्ये
योग दिन साजरा
रत्नागिरी ः तालुक्यातील कसोप-फणसोप येथील लक्ष्मीकशव माध्यमिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रशालेच्या पटांगणात सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी वेगवेगळी आसन केली. या वेळी आसनांची आवश्यक माहिती मुख्याध्यापिका सौ. राजेशिर्के यांनी दिली. शिक्षक श्री. झोरे व श्री. मदगे यांनी विद्यार्थ्यांना अनेक साधी सोपी आसन करून दाखवली. या वेळी संस्थाध्यक्ष कमलाकर साळवी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

डाएटच्या प्राचार्यांची
बाजेकुंभ शाळेला भेट
रत्नागिरी ः रत्नागिरी जिल्हा शिक्षण, प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सुशील शिवलकर यांनी रत्नागिरी तालुक्यातील नेवरे बाजेकुंभ या शाळेला भेट दिली. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शाळेचे मुख्याध्यापक नितीन सावंत, उपशिक्षिका अनुराधा पोतदार यांनी पुष्पगुच्छ देऊन प्राचार्य शिवलकर यांचे स्वागत केले. सुशील शिवलकर यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा आढावा घेत निपुण महाराष्ट्र अंतर्गत शिक्षकांना मार्गदर्शन केले. प्राचार्य शिवलकर यांच्या भेटीचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी त्यांना सोनचाफ्याचे रोपटे भेट दिले.

शालेय साहित्याचे
टिके शाळेत वाटप
पावस ः रत्नागिरी तालुक्यातील टिके नं. २ शाळेत संदीप यशवंत पावसकर यांच्याकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला उपसरपंच संजय भातडे, श्री. गोताड, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मिताली कांबळे, जनार्दन भातडे, मुख्याध्यापक सौ. नलावडे, शरयू धामापूरकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: ''आरक्षण घेऊन बोगस लोक खुर्चीवर बसले आहेत'', जरांगे पाटलांचं दसरा मेळाव्यात मोठं विधान

Nashik News : समाजहितासाठी कार्य करणाऱ्यांचा गौरव! मुक्त विद्यापीठातर्फे बाबूराव बागूल व रुक्मिणी पुरस्कारांचे वितरण

Ravana Descendants : आजही भारतात राहतात रावणाचे वंशज, साजरा करत नाहीत दसरा, विजयादशमीला करतात रावणाची पूजा..

R Ashwin युएईच्या T20 लीगमध्ये अनसोल्ड राहण्यामागं वेगळंच कारण? सोशल मीडियावरील पोस्टही हटवल्या...

Mehbooba Mufti : राष्ट्रगीताच्या वेळी उभे न राहिल्याने पंधरा जण ताब्यात; कारवाईबाबत मेहबुबा मुफ्ती यांचे टीकास्त्र

SCROLL FOR NEXT