कोकण

वीजदर कपातीचा साडेपाच लाख ग्राहकांना दिलासा

CD

वीजदर कपातीचा ग्राहकांना दिलासा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २६ : राज्यातील वीज ग्राहकांसाठी वीजदर ठरवण्यासाठी महावितरणने दाखल केलेल्या याचिकेवर महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने निर्णय दिला आहे. घरगुती, औद्योगिक आणि व्यावसायिक अशा सर्व ग्राहकांच्या वीजदरात आगामी ५ वर्षात कपात करण्याचा आदेश दिला आहे. जिल्ह्यातील सुमारे साडेपाच लाख वीज ग्राहकांना याचा फायदा होणार आहे.
राज्याच्या इतिहासात प्रथमच वीजदरात कपातीचा प्रस्ताव महावितरणकडून सादर झाला आणि आयोगाने आगामी पाचही वर्षात वीजदर कमी करण्याचा आदेश दिला आहे. स्मार्टमीटर असलेल्या घरगुती ग्राहकांना दिवसा वीजवापरासाठी दहा टक्के अतिरिक्त टीओडी सवलत आणि सौरऊर्जा निर्मिती करणाऱ्या घरगुती ग्राहकांना प्रोत्साहन ही या आदेशाची वैशिष्ट्ये आहेत. वीजदर कमी करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषीवाहिनी योजना २.० ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी अंमलात येणाऱ्या या योजनेत विकेंद्रित स्वरूपात सौरऊर्जेद्वारे वीज तयार करून त्यावर पंप चालवण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांना दिलासा देताना महावितरणच्या वीजखरेदी खर्चात कपात करण्यासाठी ही योजना महत्त्वाची ठरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kamaltai Gawai : आरएसएसच्या विजयादशमी सोहळ्याला जाणार की नाही? कमलताई गवईंनी केले स्पष्ट; म्हणाल्या- आम्ही आंबेडकरी चळवळीसाठी समर्पित पण...

Maharashtra government decision : महायुती सरकारचा मोठा निर्णय; राज्यात आता दुकानं, हॉटेल्ससह इतर अस्थापनं 24 तास उघडी ठेवता येणार!

Alandi News : आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीवर राज्यातील पहिली 'महिला तक्रार निवारण समिती' स्थापन

2 October Numerology 2025: 'या' मूलांकाच्या लोकांना पैसा मिळणार, प्रेमही फुलणार...; वाचा १ ते ९ अंकांसाठी दिवस कसा असेल?

Pawanraje Sonawane : एसटीच्या आरक्षणावर डाका टाकू देणार नाही; कन्नडमध्ये 'आदिवासींचा हुंकार, जनआक्रोश, आरक्षण बचाव मोर्चा'

SCROLL FOR NEXT