swt2610.jpg
73258
कलंबिस्तः शिवसाम्राज्य प्रतिष्ठानतर्फे शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
मराठी शाळांना नवउर्जा देण्याचा संकल्प
''शिवसाम्राज्य''चा पुढाकारः कलंबिस्तमध्ये शालेय साहित्य वाटप
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २६ः मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला असला तरी, पटसंख्येअभावी ओस पडत चाललेल्या मराठी शाळांना पुन्हा चैतन्य मिळवून देण्यासाठी कलंबिस्त-गणेशवाडी येथील ‘शिवसाम्राज्य प्रतिष्ठान’ने एक आदर्श उपक्रम हाती घेतला आहे. त्यांनी अंगणवाडी व प्राथमिक शाळेतील मुलांना दत्तक घेण्याचा संकल्प करत शैक्षणिक मदत देण्यास सुरुवात केली आहे.
या शैक्षणिक वर्षात प्रतिष्ठानने कलंबिस्त प्राथमिक शाळा क्र. १ आणि गणेशवाडी अंगणवाडीतील सुमारे ५० मुलांना चित्रकलेचे ज्ञान आणि मराठी भाषेची सहज ओळख व्हावी, यासाठी प्रयत्न केले. यासाठी त्यांना मराठी अंकलिपी, मराठी अक्षर ओळख आणि एज्युकेशन किट भेट म्हणून देण्यात आले.
माजी सैनिकांच्या गावातील दूरदृष्टीच्या तरुणांनी तीन वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या या प्रतिष्ठानने गावातील शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक आणि आध्यात्मिक विकासाचा संकल्प केला होता. मराठी शाळांची दुरवस्था पाहून त्यांनी मराठी भाषा आणि शाळांच्या संवर्धनाचे कार्य हाती घेतले. प्रतिष्ठानने मंगळवारी (ता. २४) शाळेतील परिस्थितीचा अभ्यास करून पहिली ते चौथी आणि अंगणवाडीच्या मुलांना चित्रकला साहित्य वाटप केले. यामुळे मुले मोबाईलपासून दूर होऊन चित्रांचे धडे गिरवतील, असा विश्वासही व्यक्त केला.
या उपक्रमात प्रतिष्ठानचे अध्यक्ष सिद्धेश सावंत, सचिव रोहन सावंत यांच्यासह अनेक सदस्य सक्रिय सहभागी झाले. मुख्याध्यापक संजय शेडगे यांनी प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक करत यामुळे गावातील विद्यार्थी पुन्हा मराठी शाळेकडे वळतील, अशी आशा व्यक्त करताना या कार्यात सातत्य राखणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करून सामाजिक कार्य करत असल्याचे अध्यक्ष सिद्धेश सावंत यांनी नमूद केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.