कोकण

सामंत विद्यालयात राजर्षी शाहू जयंती

CD

सामंत महाविद्यालयात
राजर्षी शाहू जयंती
पाली ः पाली येथील डी. जे. सामंत महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली. या वेळी महाविद्यालयाचे एनएसएस कार्यक्रमाधिकारी प्रा. सुदीप पवार, मराठी विभागप्रमुख प्रा. ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. या वेळी प्रा. भूषण पाध्ये, अवनी नांगले, प्रज्ञा तांबे, प्रतीक कांबळे आदी उपस्थित होते.

आदिवासी शाळेत
शैक्षणिक साहित्य वाटप
मंडणगड ः तालुक्यातील तिडे आदिवासी शाळेत पहिली ते पाचवीतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप साई दिव्य मेडिकल आणि एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे करण्यात आले. प्रत्येक मुलाला एक स्कूलबॅग, वह्या व लेखनासाठी आवश्यक सर्व साहित्य देण्यात आले. मुख्याध्यापक नीलेश लोखंडे, ट्रस्टचे अध्यक्ष महेश आंब्रे आदी उपस्थित होते. साहित्य वाटपानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले.

काटवलीत उद्या
शालेय साहित्य वाटप
साडवली ः नजीकच्या काटवली गावातील गणेश मंडळ घागवाडी पुरस्कृत विद्यार्थी कल्याणकारी संस्थेतर्फे काटवली परिसरातील गरजू शालेय मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप होणार आहे. देवाची सहाण येथे २८ जूनला सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. विद्यार्थी, पालकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष शशिकांत घाग यांनी केले आहे.

वांझोळे विद्यालयात
शैक्षणिक साहित्य वाटप
साडवली ः संगमेश्वर तालुक्यातील वांझोळे येथील शिवाजी माध्यमिक विद्यालयात शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. देणगीदार विजय पंदेरे, संजय सारवटकर, प्रकाश शेडगे यांच्याकडून हे साहित्य देण्यात आले. सरपंच निधी पंदेरे यांच्याकडून शाळेसाठी पिण्याच्या पाण्याची ५०० लिटरची टाकी, वॉटरफिल्टर व सॅनिटरी पॅड मशिन देण्यात आले. या वेळी संस्थेचे अध्यक्ष अनिल पंदेरे, उपाध्यक्ष पांडुरंग पाटील, सचिव शांताराम शेडगे व सर्व संस्था सदस्य उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dussehra Melava 2025 Live Update : आज महात्मा गांधींची जयंती, त्याचं स्वातंत्र्यासाठी योगदान महत्त्वपूर्ण - सरसंघचालक मोहन भागवत

IND vs WI 1st Test Live: वेस्ट इंडिजने टॉस जिंकला अन् स्वतःचाच घात करून घेतला; भारत ३ स्पिनर्स, २ फास्टर अन् १ ऑलराऊंडरसह उतरला

Dasara Festival: छत्रपतींच्या काळात कसा साजरा व्हायचा दसरा... इंग्रजांच्या तोफा द्यायच्या सलामी! ऐतिहासिक पत्र समोर

Maharashtra Sugar Season: 'साखर हंगामला दिवाळीनंतर सुरुवात'; शेतकरी, ऊसतोड मजूर, कारखान्यांच्यादृष्टीने समाधानकारक निर्णय..

पद्मविभूषण पंडित छन्नूलाल मिश्र यांचं निधन, 2014ला मोदींनी वाराणसीतून लढावं यासाठी बजावलेली महत्त्वाची भूमिका

SCROLL FOR NEXT