कोकण

-संगमेश्वरमध्ये आजपासून खतपुरवठा सुरळीत

CD

खतपुरवठा आजपासून सुरळीत
विनोद हेगडे ः संगमेश्वरातील शेतकऱ्यांना दिलासा
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २६ ः तालुक्यातील धामणीसह बारा गावांमध्ये युरिया खताचा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याबाबत तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे यांनी शुक्रवारपासून (ता. २७) तालुक्यात युरिया खताचा सुरळीत पुरवठा सुरू होणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
तालुक्यातील कृषी केंद्रांवर सध्या युरियाच्या मागणीपेक्षा कमी साठा असल्याने शेतकऱ्यांना प्रत्यक्ष रांगेत उभे राहावे लागत आहे. काही ठिकाणी गैरसमज आणि अफवांमुळेही गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नव्या साठ्याची वितरण प्रक्रिया नियोजनबद्ध पद्धतीने राबवण्यात येणार आहे. ज्या गावांमध्ये तुटवडा अधिक आहे त्या गावांना प्राधान्याने खतपुरवठा केला जाणार आहे. शुक्रवारपासून युरिया खताचा सुरळीत पुरवठा सुरू होणार असून, शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. सर्व गावांमध्ये टप्प्याटप्प्याने खत पोहोचवले जाणार असल्याचे हेगडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pro Kabaddi 12: नो हँडशेक ड्रामा! हरियाना स्टीलर्सने हास्तांदोलन टाळण्यावेळी काय झालं होतं? दबंग दिल्लीचा कर्णधार म्हणतोय...

MLA Rohit Pawar : सरकार झोपेत असेल तर... मग आम्ही गप्प बसणार नाही; शेतक-यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही

Latest Marathi News Live Update: राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघ आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर

Dasara Festival: आपट्याच्या झाडाचं नेमकं महत्त्व काय? पानं दसऱ्याला सोनं म्हणून का वाटतात?

Electricity Shock : विजेच्या शॉक लागुन तरुण शेतकऱ्याचा मृत्यू; कन्नड तालुक्यातील चिंचखेडा (बुद्रुक) येथील घटना

SCROLL FOR NEXT