कोकण

नवोदय विद्यालयासाठी स्वामिनी तर्पेची निवड

CD

73344

नवोदय विद्यालयासाठी
स्वामिनी तर्पेची निवड
बांदा, ता. २६ ः पीएम श्री जिल्हा परिषद बांदा क्र. १ केंद्रशाळेतील स्वामिनी तर्पे हिची नवोदय विद्यालय सांगेली येथे निवड झाली. तिला शाळेच्यावतीने शुभेच्छा देण्यात आल्या. चालू वर्षी फेब्रुवारीमध्ये जवाहर नवोदय विद्यालयाची प्रवेश परीक्षा झाली.
मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्यावतीने घेतलेल्या या परीक्षेसाठी सहावीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना बारावीपर्यंतचे शिक्षण मोफत मिळते. गेल्या पाच वर्षांत बांदा प्रशालेतील जवळपास पंधरा विद्यार्थी जवाहर नवोदय विद्यालय सांगेली येथे निवड झालेले आहेत. स्वामिनी हिला मुख्याध्यापक शांताराम असनकर, वर्गशिक्षिका शुभेच्छा सावंत, पदवीधर शिक्षक उदय सावळ, जे. डी. पाटील, रंगनाथ परब, फ्रान्सिस फर्नांडिस, स्नेहा घाडी, जागृती धुरी, मनीषा मोरे,‌ कृपा कांबळे, प्रसन्नजित बोचे, सुप्रिया धामापूरकर‌ यांचे मार्गदर्शन लाभले. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रत्नाकर आगलावे, उपाध्यक्ष संपदा सिद्धये व पालकांनी अभिनंदन केले. स्वामिनीने मिळविलेल्या यशाबद्दल कौतुक होत आहे.
..................
73345

बांदा क्र. १ केंद्रशाळेत
शाहू महाराजांना वंदन
बांदा, ता. २६ ः समतेची शिकवण देणाऱ्या लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीदिनी येथील पीएम श्री जिल्हा परिषद क्र. १ केंद्रशाळेत स्काऊट गाईड पथकामार्फत अभिवादन केले. मुख्याध्यापक शांताराम असनकर यांनी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी आपल्या भाषणातून शाहू महाराज यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. शुभम झोरे, आयुष असनकर, समर्थ नार्वेकर, हर्षद ठाकूर, साईदत्त कर्पे, विहान गवस, नाजुका खान, तेजस्वी गुरव, सई गवंडळकर, जिविका पाडलोसकर, शभ्रा म्हाडगुत, दुर्गा लोके या विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पदवीधर शिक्षक उदय सावळ, रंगनाथ परब, जे. डी. पाटील, फ्रान्सिस फर्नांडिस, शुभेच्छा सावंत, स्नेहा घाडी, जागृती धुरी, मनीषा मोरे‌, कृपा कांबळे, प्रसन्नजित बोचे, सुप्रिया धामापूरकर‌ यांनी सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: ''तुम्ही बंजारा समाजासारखे दिसत नसतानाही आरक्षण का खाल्लं?'', धनंजय मुंडेंना उद्देशून जरांगेंचं मोठं विधान

अडीच वर्षांपूर्वी विवाह, पतीसह सासरच्यांकडून छळ; पोलिसाच्या पत्नीनं तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत संपवलं जीवन, दिरानं रुग्णालयात नेलं, पण...

IND vs WI 1st Test Live: अरे आताच फिफ्टी झाली होती, कशाला घाई केली! Shubman Gill चा चुकीचा फटका अन् विंडीजला मिळाली विकेट

Crop Loss: पिकेच झाली उद्‍ध्वस्त, खत देणार कशाला? नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ७० हजार टनांहून अधिक साठा पडून

Layoff 2025: अमेरिकन कंपनीचा धक्कादायक निर्णय; 4 मिनिटांच्या कॉलमध्येच भारतीय कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं

SCROLL FOR NEXT