कोकण

ग्रामपंचायतींमध्ये जलमित्र नियुक्ती प्रक्रियेला प्रारंभ

CD

ग्रामपंचायतींमध्ये
जलमित्र नियुक्ती
प्रक्रियेला प्रारंभ
सिंधुदुर्गनगरी ः जल जीवन मिशन योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये बहु कौशल्यावर आधारित प्लंबर गवंडी, मेकॅनिक फिटर, इलेक्ट्रिशियन पंप ऑपरेटर याप्रमाणे तीन पात्र नामनिर्देशित उमेदवारांना बहु कौशल्य संचाचे प्रशिक्षण शासनामार्फत देण्यात येणार आहे. त्याकरिता तालुकास्तरावर स्क्रीनिंगची प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायतींमध्ये नल जलमित्र नियुक्ती प्रक्रिया सुरू असून एकूण फिटर मेकॅनिकचे ११२८ नाम निर्देशन प्राप्त झाले आहेत. आतापर्यंत ३७७ ग्रामपंचायतचे फिटर मेकनिक स्क्रीनिंग पूर्ण झाले आहे तर गवंडी प्लंबरसाठी १२३९ नाम निर्देशन प्राप्त आहेत. इलेक्ट्रिशियन पंप ऑपरेटर या ट्रेडसाठी ११४० नामनिर्देशन प्राप्त आहेत. मात्र, या दोन्ही ट्रेडसाठीचे स्क्रीनिंग प्रक्रिया शिल्लक आहे. ही प्री स्क्रीनिंगची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रति ग्रामपंचायत बहु कौशल्यावर आधारित स्किल कौन्सिलद्वारे नियुक्त नवोदय कृषी प्रतिष्ठान सांगली या संस्थेमार्फत तीन बहु कौशल्य संचाकरिता प्रती कौशल्य संचनिहाय प्रति ग्रामपंचायत एका उमेदवारास मल्टीस्किलिंग आरपीएल मॉडेल बहु कौशल्यावर आधारित कौशल्य प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कार्यालयाकडून देण्यात आली.
--------------
माणगाव येथे आषाढ
कीर्तन महोत्सव
सिंधुदुर्गनगरी ः प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज पुण्यतिथीनिमित्त कीर्तनगंगा परिवार व दत्त मंदिर न्यास, माणगांव यांच्या संयुक्त विद्यमाने टेंब्ये स्वामी महाराज मंदिर, माणगाव येथे १० जुलैपर्यत आषाढ कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले आहे. काल (ता.२६) पासून याला प्रारंभ झाला. होणारे कार्यक्रम असे ः २६ व २७ ला ह. भ. प. श्री अवधूतबुवा धुपकर यांचे कीर्तन, उद्या (ता.२८) प्रवचनकार वे. मू. श्री. सचिन भाटवडेकर गुरूजी यांचे प्रवचन, २९ व ३० ला कीर्तनकार ह. भ. प. श्री. रोहनबुवा पुराणिक, १ जुलै कीर्तनकार ह. भ. प. श्री महेंद्रबुवा पंतमिराशी, २ व ३ जुलै कीर्तनकार ह. भ. प. श्री. भास्करबुवा मुंडले, ४ जुलै कीर्तनकार ह. भ. प. श्री. केशवबुवा परांजपे, ५ जुलै कीर्तनकार ह. भ. प. सुपर्णबुवा पोखरणकर, ६ जुलै कीर्तनकार ह. भ. प. श्री. पुरूषोत्तमबुवा पोखरणकर, ७ जुलै कीर्तनकार ह. भ. प. श्री. संतोषबुवा मुंडले, ८ जुलै कीर्तनकार ह. भ. प. सौ. मृणालताई गावकर-ठाकुर-देसाई, ९ व १० जुलैला कीर्तनकार ह. भ. प. श्री. दत्तात्रेयबुवा उपाध्ये हे उत्सवाची सांगता करणार आहेत. ५ ते ६.३० या वेळेत ही कीर्तने होणार आहेत. जिल्ह्यातील जास्तीत जास्त कीर्तन रसिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कीर्तनगंगा समुह व दत्तमंदिर न्यास माणगांव यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : निजामाचं गॅझेट स्वीकारलं म्हणता मग तुम्ही इंग्रजांच्या परिवारातले आहात का ? मनोज जरांगेंना राग अनावर, जीभ घसरली?

Dussehra 2025: चक्क...या गावात होते रावणाची पूजा? काय आहे नेमकी परंपरा जाणून घेऊयात

Dussehra Melava 2025 Live Update: वणी येथे राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे संचलन व शस्त्रपूजन उत्साहात

Mangalwedha Farmers : स्वतःचे नुकसान बाजूला ठेवत सरकारलाच 15 रुपये मदतनिधी पाठवला

Latest Marathi News Live Update : शतंचडी यागास पुर्णाहूती व महाआरतीने वणी गडावर नवरात्रोत्सवाची सांगता...

SCROLL FOR NEXT