73815
अमली पदार्थांविरोधात जागृती आवश्यक
शिवराज झांजुर्णे ः बांदा महाविद्यालयात प्रबोधनात्मक कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २८ ः अमली पदार्थांच्या व्यसनाने माणसाला अशा पातळीवर आणले आहे की, आता माणूस त्यांच्या सेवनासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. अमली पदार्थांची नशा करण्यासाठी गुन्हे देखील घडू शकतात. आरोग्यदायी, सुसंस्कृत सामाजिक स्वास्थ्यासाठी तरुणांनी व्यसनापासून दूर राहावे, असे आवाहन बांदा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवराज झांजुर्णे यांनी येथे केले. आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त येथील गोगटे-वाळके महाविद्यालयात आयोजित प्रबोधनात्मक कार्यक्रमात ते बोलत होते.
बांदा पोलिस ठाणे आणि गोगटे-वाळके कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिन महाविद्यालयात नुकताच झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. एन. डी. कार्वेकर होते. श्री. झांजुर्णे म्हणाले, ‘बदलत्या समकालात विशेषत: तरुणी व महिलाही ड्रग्जच्या बाबतीत मागे राहिल्या नाहीत. या व्यसनाने वैयक्तिक आणि सामाजिक जीवनातही ताणतणाव, बदलत्या वैवाहिक जीवनामुळे आणि इतर कारणामुळे व्यसनाधीनता वाढत आहे. याबाबत पालकांनी सजग व्हावे. याबाबत समाजामध्ये जागृती व्हायला हवी. सजग नागरिकांनी ही एक प्रबोधनात्मक चळवळ समाजामध्ये रुजवायला हवी.’
डॉ. कार्वेकर म्हणाले, ‘अमली पदार्थांमुळे तरुण पिढी आपले भविष्य हरवत चालली आहे. अमली पदार्थांच्या सेवनाने शारीरिक क्षमता, तर कमी होतातच, तसेच सामाजिक स्वास्थ्यही बिघडते. समाजाचा चेहरामोहरा बदलण्यास अशा वाईट दुष्कृत्यांचा हातभार लागतो. त्यामुळे समाजामध्ये सजग असणारी तरुण पिढी निर्माण होणे नितांत गरजेचे आहे.’ राष्ट्रीय सेवा योजना विभागप्रमुख प्रा. निरंजन आरोंदेकर यांनी सूत्रसंचालन केले. अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. रश्मी काजरेकर यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.