कोकण

शिरळ-वैजी-भोम मार्गांवर धावणार लालपरी

CD

शिरळ-वैजी-भोम मार्गांवर धावणार लालपरी
२२ वर्षानंतर पुन्हा बससेवा सुरू; आमदार जाधवांचा पाठपुरावा
चिपळूण, ता. २९ः तालुक्यातील शिरळ-वैजी-भोम या मार्गांवर २२ वर्षानंतर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बससेवा सुरु होणार आहे. यासाठी आमदार भास्कर जाधव यांनी पाठपुरावा केला आहे.
शिरळ-भोम मार्गांवर २२ वर्षांपुर्वी बससेवा सुरु होती. मात्र अपेक्षित प्रवासी संख्या नसल्याने आणि येथील मुख्य रस्ता याची दयनीय अवस्था याची कारणे देत चिपळूण आगाराने या मार्गांवरील बससेवा बंद केली. मात्र याचा जास्त त्रास या मार्गांवरील असणाऱ्या रेहेळ या गावातील लोकांना आणि विद्यार्थ्यांना होत होता. शालेय मुलांना आणि कामानिमित्त चिपळूण ला येणाऱ्यांना ३ किमी. पायपीट करावी लागत होती. ती आत्ता थांबणार आहे. त्यामुळे गेली २२ वर्षे येथील लोक बससेवेच्या प्रतिक्षेत होते.
यावर्षी पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून येथील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. त्यामुळे या मार्गांवर पुन्हा बससेवा सुरु व्हावी, यासाठी येथील स्थानिक सरपंच शशिकांत राऊत, सरपंच आणि शिवसेना खाडीपट्टा उपविभाग प्रमुख फैयाज शिरळकर, विभागप्रमुख नितीन निकम, रेहेळ वैजीचे सरपंच संदीप जाबरे, उपसरपंच रुपेश शेलार, भोमचे सरपंच मिलिंद शिर्के, हेमंत मोरे, राजू मोरे तसेच स्थानिक ग्रामस्थांनी आमदार भास्कर जाधव यांना निवेदन दिले होते. जाधव यांनी तात्काळ चिपळूण आगार प्रमुखांना पत्र देऊन ही बससेवा तात्काळ सुरु करावी असे सांगितले होते. त्यानंतर आगारप्रमुखांनी तत्काळ बससेवा सुरु केली आहे. उद्यापासून (ता. ३०) ही बससेवा नियमित सुरु होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 1st Test Live: दुबईहून 'हॉटसीट'...! Ravi Shastri असं काही म्हणाले, ज्याने पाकिस्तानच्या बुडाला लागली आग, Video

Dussehra Photos : दसऱ्याला बनवा एकदम खास! फॅमिली फोटोपासून कपल फोटो पर्यंत..रावण दहन अन् उत्सवाचे AI फोटो बनवा एका क्लिकवर..

Dussehra Melava 2025 Live Update : थोड्याच वेळात मनोज जरांगेंचा दसरा मेळावा, रुग्णवाहिकेतून रवाना...

Nashik Kalika Mata Temple : २७ वर्षांनी जुळून आला 'दहा दिवसांच्या' नवरात्रीचा योग; कालिका देवी मंदिरात उत्साह

बेस्ट फ्रेंडचा प्रेमसंबंधाला नकार, माझी नाही तर कोणाचीच नाही म्हणत संपवलं; १७ वर्षीय तरुणीच्या हत्येचा उलगडा, तरुणाला अटक

SCROLL FOR NEXT