कोकण

मंडणगडमध्ये शिवसेना व मनसेचा आनंदोत्सव

CD

मंडणगडात शिवसेना, मनसेचा आनंदोत्सव
हिंदी सक्तीचा शासन निर्णय रद्द ; मिठाई वाटप
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. १ ः पहिलीपासून हिंदी विषय सक्तीचा असल्याचा शासन निर्णय राज्य शासनाने रद्द केल्याने मंडणगड शहरात शिवसेना ठाकरे गट व मनसे यांनी शहरातील मुख्य चौकात आनंद उत्सव साजरा केला. या वेळी शिवसेना ठाकरे गटाचे तालुका संघटक जितेंद्र दवंडे, सल्लागार रघुनाथ पोस्टुरे, मोहन दळवी, समीर कदम, दशरथ सापटे, अभय पिचुर्ले, विश्वनाथ टक्के, कलंदर जोगिलकर, मनसेचे नवज्योत गौड व दोन्ही पक्षाचे तालुक्यातील कार्यकर्ते हजर होते.
पक्षाचा जयजयकार करीत फटाके फोडण्यात आले. नागरिकांना मिठाई वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. याचबरोबर नुतन विद्यामंदिरमधील पहिलीच्या वर्गात मिठाई वाटून आनंद साजरा करण्यात आला. याप्रसंगी शिवसेना तालुका संघटक जितेंद्र दवंडे म्हणाले, राज्य सरकारने बालकांवर केलेली हिंदी या विषयाची सक्ती शिवसेना व मनसे यांनी हाणून पाडली आहे. पाच तारखेचे मोर्चाचे आव्हानास शासन घाबरले व शासन निर्णय मागे घेतला. त्याचा आनंद असून नागरिकांना, मुलांना मिठाई वाटून साजरा केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला दिल्ली उच्च न्यायालयाचा जबरदस्त झटका!

IND vs ENG 2nd Test : ३० चौकार, ३ षटकार! शुभमन गिलचे त्रिशतक थोडक्यात हुकले; पठ्ठ्याने इंग्लंडचे मैदान गाजवले, भारताचा धावांचा डोंगर

Pune News : महिला कर्मचाऱ्याने कामाला लावण्यासाठी सुमारे २५ जणांकडून हजारो रुपये उकळले; चौकशी केली, पण अहवाल अर्धवट

Ashadhi Ekadashi: मुंबईहून थेट पोहोचणार पंढरपुरात, आषाढी वारीसाठी विशेष एसटीचे आयोजन, कसे असेल वेळापत्रक?

Viral Video: कमरेवर हात अन्...; खेळण्याच्या वयात चिमुकल्याचा पोटासाठी संघर्ष, पुण्यातील 'हा' व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

SCROLL FOR NEXT