कोकण

-राजापूर नगर वाचनालय आता रविवारी बंद राहणार

CD

-rat३०p११.jpg -
२५N७४१५१
राजापूर ः राजापूर नगर वाचनालयाच्या वार्षिक सभेत बोलताना प्रभात पाध्ये. शेजारी मान्यवर.
---
राजापूर वाचनालय आता रविवारी बंद
वार्षिक सभेत निर्णय ; ग्रंथपालक कारेकरांचा गौरव
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १ ः आतापर्यंत दर मंगळवारी आठवडा सुटीमुळे बंद राहणारे राजापूर नगर वाचनालय यापुढे दर रविवारी बंद राहणार आहे. रविवारी सर्वसाधारण सुटीच्या दिवशी वाचकांचा मिळणारा प्रतिसाद लक्षात घेवून मंगळवार ऐवजी रविवारी आठवडा सुटी ठेवण्याचा निर्णय राजापूर नगर वाचनालय या संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये घेण्यात आला.
राजापूर नगर वाचनालय या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा नगर वाचनालय सभागृहात संस्थेचे अध्यक्ष प्रभात पाध्ये यांच्या अध्यक्षताखाली झाली. या वेळी उपाध्यक्ष शेखरकुमार अहिरे, किशोर जाधव, अतुल नवरे, राजेंद्र रानडे, श्रृती ताम्हणकर, सुहास ओळकर, जयेश हर्डीकर आदी कार्यकारी मंडळातील सदस्य तसेच अर्बन बँकेचे अध्यक्ष संजय ओगले, दिनानाथ कोळवणकर, विजय पाध्ये, प्रसन्न मालपेकर, जयंत कदम, गोविंद मराठे, दीपाली पंडित, अनामिका जाधव आदी उपस्थित होते.
स्वागत कार्यवाह जयंत अभ्यंकर यांनी केले. १५८ वा वार्षिक अहवाल सभेपुढे सादर करण्यात आला. लेखापाल म्हणून नीलेश पाटणकर यांच्या नियुक्तीला मंजूरी देण्यात आली. ग्रंथपालक सौ. कारेकर यांना उत्कृष्ट सुत्रसंचालक म्हणून गौरव झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव सभेत पारीत करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला दिल्ली उच्च न्यायालयाचा जबरदस्त झटका!

IND vs ENG 2nd Test : ३० चौकार, ३ षटकार! शुभमन गिलचे त्रिशतक थोडक्यात हुकले; पठ्ठ्याने इंग्लंडचे मैदान गाजवले, भारताचा धावांचा डोंगर

Pune News : महिला कर्मचाऱ्याने कामाला लावण्यासाठी सुमारे २५ जणांकडून हजारो रुपये उकळले; चौकशी केली, पण अहवाल अर्धवट

Ashadhi Ekadashi: मुंबईहून थेट पोहोचणार पंढरपुरात, आषाढी वारीसाठी विशेष एसटीचे आयोजन, कसे असेल वेळापत्रक?

Viral Video: कमरेवर हात अन्...; खेळण्याच्या वयात चिमुकल्याचा पोटासाठी संघर्ष, पुण्यातील 'हा' व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

SCROLL FOR NEXT