कोकण

चिपळूण - डेरवणमध्ये मेंदूतील पाणी नाकातून गळण्यावर शस्त्रक्रिया

CD

rat30p34.jpg -
N74251
चिपळूण ः रुग्णासमवेत डावीकडून डॉ. मृदुल भाटजीवाले, डॉ. राजीव केणी, डॉ. लीना ठाकूर आणि डॉ. अभिजित रोकडे आदी.
--------
डेरवणमध्ये मेंदूतील पाणी नाकावाटे गळण्यावर शस्त्रक्रिया
दुर्बिणीद्वारे केल्याने धोका कमी ; अत्याधुनिक साधने अन् डॉक्टर उपलब्ध
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १ : वालावलकर रुग्णालयातील डॉक्टरांनी एका दुर्मिळ आणि जीवघेण्या आजाराचे निदान करून यशस्वी उपचार केले आहेत. या आजाराचे नाव स्पॉन्टेनियस सेरेब्रोस्पायनल फ्लूइड (CSF)रायनोरिया असून,यामध्ये मेंदूतील पाणी नाकावाटे गळू लागते.
एका महिला रुग्णाने (वय ४४,चिपळूण) ईएनटी ओपीडीमध्ये १५ दिवस सतत नाकातून पाणी गळण्याची तक्रार सांगितली. सुरुवातीला सर्दीचे लक्षण असल्याचे समजून त्यांनी दुर्लक्ष केले होते; मात्र, तपासणीदरम्यान सहाय्यक प्रा. डॉ. राजीव केणी यांनी गंभीरतेची जाणीव करून दिली. हा आजार डोकेदुखी, चक्कर येणे अशा त्रासांना कारणीभूत ठरू शकतो आणि नाकातील संसर्ग मेंदूपर्यंत पोहोचण्याचा धोका निर्माण करतो. त्यामुळे तातडीने उपचार सुरू करणे अत्यावश्यक आहे, असे डॉ. केणी यांनी सांगितले. ‌या निदानानंतर रुग्णाला तत्काळ मेंदू शस्त्रक्रिया विभागाकडे पाठवण्यात आले. प्रमुख मेंदू शल्यचिकित्सक डॉ. मृदुल भाटजीवाले यांनी रुग्णाची सखोल तपासणी करून तातडीने उपचार व शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. डॉ. भाटजीवाले यांनी सीटी सिस्टर्नोग्राम ही विशिष्ट प्रक्रिया केली. या प्रक्रियेत रुग्णाच्या पाठीमधून मेंदूच्या द्रवामध्ये रंगद्रव्य (डाय) सोडले जाते आणि त्यानंतर सीटीस्कॅन घेतला जातो. यामुळे द्रव कुठून नाकात गळत आहे हे अचूक ओळखता येते. गळतीचे स्थान निश्चित झाल्यानंतर शस्त्रक्रियेची तयारी करण्यात आली.
डॉ. राजीव केणी, डॉ. मृदुल भाटजीवाले, डॉ. लीना ठाकूर आणि भूलतज्ज्ञ डॉ. अभिजित यांनी एंडोस्कोपीद्वारे गळती यशस्वीपणे थांबवली आणि ओपन मेंदू शस्त्रक्रिया टाळण्यात आली. ही संपूर्ण शस्त्रक्रिया व रुग्णालयातील उपचार महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेंतर्गत मोफत करण्यात आली.
----
कोट
आता वालावलकर रुग्णालयात पुणे, मुंबईसारख्या मोठमोठया रुग्णालयातून होणाऱ्या अतिशय अवघड शस्त्रक्रिया वालावलकर रुग्णालयात होऊ लागल्या आहेत. याचे सर्व श्रेय जाते ते संस्थेने उपलब्ध करून दिलेली अतिशय उच्च दर्जाची अशी उपचार यंत्रणा व सर्व डॉक्टर्स, स्टाफ नर्सेस व इतर कर्मचारी यांच्या सांघिक प्रयत्नाना.
- डॉ. मृदुल भाटजीवाले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिलचे द्विशतक! इंग्लंडमध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच भारतीय कर्णधार, मोडले अनेक विक्रम

Navi Mumbai News: नवी मुंबईत ७० हजार वाहनांचा चक्का जाम, नागरिकांसह आयात निर्यातदारांना मोठा फटका

Latest Maharashtra News Updates : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुक्ताई पालखीचे दर्शन घेत स्वागत केले

Thane Crime: ठाणे हादरलं! भाजप आमदारांच्या घरासमोरच गोळीबार; १ जण गंभीर जखमी, नेमकं काय घडलं?

Video : समोरा समोर दोन बसची भयानक टक्कर; अपघाताचा थरारक व्हिडिओ व्हायरल, पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT