टेक्नो..........लोगो
(११ जून टुडे ३)
फोन अनलॉक करताना चेहरा ओळखणे, एखाद्या फोटोवरून तत्सम वस्तू ऑनलाइन शोधणे किंवा शहरे अधिक सुरक्षित बनवणे, ही सर्व उदाहरणे संगणक व्हिजन या प्रगत तंत्रज्ञानामुळे शक्य झालेली आहेत. संगणकांना आणि यंत्रणांना प्रतिमा आणि व्हिडीओ समजून घेण्याची, त्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता देणाऱ्या या तंत्रज्ञानाचा वापर आता आपल्या दैनंदिन आयुष्यात विविध पातळ्यांवर वाढत चालला आहे.
- rat१p१.jpg-
25N74374
- प्रा. स. द . लाटकर
घरडा अभियांत्रिकी महाविद्यालय
sdlatkar@git-india.edu.in
--------
संगणक व्हिजन :
यंत्रशक्तीला मिळालेली ‘दृष्टी’
* संगणक व्हिजन म्हणजे काय? ः संगणक व्हिजन ही कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रातील एक महत्त्वाची शाखा आहे. त्यात संगणक प्रणाली हजारो प्रतिमा आणि व्हिडीओमधून विशिष्ट घटक जसे की चेहेरे, वस्तू, हालचाली, रंग किंवा भावभावना ओळखण्याचे शिक्षण घेतात. यासाठी सखोल प्रशिक्षण आणि प्रगत अल्गोरिदम वापरले जातात. फेसबुकवर फोटो अपलोड केल्यावर चेहरा ओळखून आपोआप टॅग सुचवला जातो, हे याच तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष उदाहरण आहे.
- विविध क्षेत्रांतील वापर ः
* स्मार्टफोन सुरक्षा ः बहुतेक स्मार्टफोनमध्ये आता चेहरा ओळखून अनलॉक करण्याची सुविधा असते. केवळ फोन सुरक्षा नव्हे, तर देयके (पेमेंट्स) व अॅप्समध्येही याचा उपयोग वाढतो आहे.
* विमानतळ व ओळख पडताळणी ः DigiYatra उपक्रमांतर्गत काही विमानतळांवर चेहरा ओळख प्रणाली वापरून कागदपत्रांशिवाय ओळख पटवली जाते. त्यामुळे प्रवासाची प्रक्रिया जलद व सुलभ होते.
* वैद्यकीय क्षेत्र : डॉक्टर एक्स-रे, एमआरआय, सीटी स्कॅन आदी प्रतिमांचे विश्लेषण संगणक व्हिजनच्या मदतीने अधिक अचूकपणे करू शकतात. लक्षणे लवकर समजल्यामुळे निदान वेळेत करता येते.
* ई-कॉमर्स व रिटेल ः ग्राहक फोटो अपलोड करून तत्सम उत्पादने शोधू शकतात. ‘वर्च्युअल ट्राय-ऑन’सारख्या सुविधांमुळे खरेदीचा अनुभवही अधिक सुलभ होतो.
* शेती ः ड्रोन व सेन्सर्सच्या साह्याने पिक वाढ, रोग, किड, आर्द्रता इत्यादींचा अभ्यास केला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर निर्णय घेणे शक्य होते.
* शहरे व सुरक्षाव्यवस्था : स्मार्ट कॅमेऱ्यांद्वारे वाहतूक नियंत्रण, गर्दीचे निरीक्षण व आपत्कालीन परिस्थिती ओळखता येते. काही शहरांमध्ये कचरा व्यवस्थापनही याच तंत्रज्ञानाच्या सहाय्याने स्मार्ट पद्धतीने केले जाते.
* नवीन संधी आणि जबाबदाऱ्या ः संगणक व्हिजन केवळ एक सुविधा नसून, विविध उद्योगांमध्ये परिवर्तन घडवून आणणारे तंत्रज्ञान आहे. शिक्षण क्षेत्रातही आता याचा वापर वाढत आहे. उदाहरणार्थ, विद्यार्थ्यांचे हावभाव, लक्ष केंद्रित आहे की नाही, ते वर्गात सक्रिय आहेत का, हे ओळखण्यासाठी संगणक व्हिजन चा वापरले केला जातो. विशेषतः ऑनलाइन शिक्षणात, शिक्षक किंवा प्रणाली विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावरील भाव, डोळ्यांची हालचाल किंवा एकाग्रतेच्या पातळीवरून त्यांच्या सहभागाचे मूल्यांकन करू शकते.
इतकेच नव्हे, तर ऑनलाईन परीक्षा देताना देखील संगणक व्हिजन वापरून विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि अन्य कुठल्याही गैरप्रकारांचे निरीक्षण केले जाऊ शकते. त्यामुळे परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणि विश्वासार्हता वाढते.
तथापि, तंत्रज्ञानासोबत काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या येतात. उदाहरणार्थ, चेहरा ओळख प्रणाली सर्व व्यक्तींचे चेहरे सारख्याच अचूकतेने ओळखत नाही. कधीकधी विशिष्ट त्वचेच्या रंगासारख्या घटकांमुळे ओळखण्यात चूक होऊ शकते. यालाच ‘पूर्वग्रह’ (bias) असे म्हणतात. तसेच, या प्रणालींमध्ये वापरली जाणारी वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे. वापरकर्त्यांची अनुमती घेतल्याशिवाय ही माहिती कुठेही वापरली जाऊ नये. याशिवाय, प्रणाली कशी निर्णय घेते, त्यामागची प्रक्रिया काय आहे, यामध्ये पारदर्शकता असणेही तितकेच गरजेचे आहे.
* निष्कर्ष
संगणक व्हिजन ही केवळ तांत्रिक प्रगती नाही, तर समाजाच्या प्रत्येकस्तरावर परिणाम करणारी एक डिजिटल क्रांती आहे. यंत्रशक्तीला मिळालेली ही ‘दृष्टी’ भविष्यातील भारताला अधिक स्मार्ट, सुरक्षित आणि सक्षम बनवण्याची क्षमता बाळगते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.