कोकण

यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूटचे अभियांत्रिकी पदविका परीक्षेत यश

CD

ेwt18.jpg
74403
लीना चव्हाण, प्रतीक झारापकर, स्टेला डांटस, पूजा कोकरे

यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूटचे
अभियांत्रिकी पदविका परीक्षेत यश
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १ः महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळातर्फे पदविका अभियांत्रिकी उन्हाळी सत्र परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा निकाल ९० टक्के लागला. कॉलेजच्या चार पैकी तीन विभागांत मुलींनी अव्वल स्थान पटकावले असून एका विभागात मुलाने प्रथम स्थान प्राप्त केले. तृतीय वर्ष कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा निकाल ९५ टक्के लागला.
लीना चव्हाण हिने ९४.८६ टक्के गुणांसह प्रथम, पूजा सरमळकर (९१.५४) हिने द्वितीय, आर्या परब (८९.५४) हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला. तृतीय वर्ष सिव्हिल विभागाचा निकाल १०० टक्के लागला. स्टेला डांटस (८६.४७) प्रथम, प्रज्योत दळवी (८६.४२) याने द्वितीय, केशव बर्डे (८५.२६) याने तृतीय क्रमांक प्राप्त केला.
तृतीय वर्ष इलेक्ट्रिकल विभागाचा निकाल ९० टक्के लागला. यात प्रतीक झारापकर (९०.५६) याने प्रथम, अथर्वा परब (८७.७८) द्वितीय तर सायली गिरी (८७.१७) हिने तृतीय क्रमांक पटकावला. तृतीय वर्ष मेकॅनिकल विभागाचा निकाल ७८ टक्के लागला. पूजा कोकरे (८८.६७) हिने प्रथम, सुयोग देसाई (८५.८६) द्वितीय तर संतोष शर्मा (८४.९९) याने तृतीय क्रमांक प्राप्त केला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत-भोसले, प्राचार्य डॉ. रमण बाणे, उपप्राचार्य गजानन भोसले यांनी अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला दिल्ली उच्च न्यायालयाचा जबरदस्त झटका!

IND vs ENG 2nd Test : ३० चौकार, ३ षटकार! शुभमन गिलचे त्रिशतक थोडक्यात हुकले; पठ्ठ्याने इंग्लंडचे मैदान गाजवले, भारताचा धावांचा डोंगर

Pune News : महिला कर्मचाऱ्याने कामाला लावण्यासाठी सुमारे २५ जणांकडून हजारो रुपये उकळले; चौकशी केली, पण अहवाल अर्धवट

Ashadhi Ekadashi: मुंबईहून थेट पोहोचणार पंढरपुरात, आषाढी वारीसाठी विशेष एसटीचे आयोजन, कसे असेल वेळापत्रक?

Viral Video: कमरेवर हात अन्...; खेळण्याच्या वयात चिमुकल्याचा पोटासाठी संघर्ष, पुण्यातील 'हा' व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

SCROLL FOR NEXT