कोकण

मंडणगड-आगार १४ लाखांनी तोट्यात

CD

-rat१p२.jpg
P२५N७४३७५
मंडणगड ः मंडणगड आगाराचे चाक कमी भारमानाच्या चिखलात रुतत चालले आहे.
--------
मंडणगड आगारास १४ लाख तोटा
मे महिन्यातील स्थिती ; ग्रामीण भागातील भारमान ५० टक्केच
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. १ ः सुटीचा आणि पर्यटनाचा हंगाम असूनही भारमान नसल्याने मंडणगड आगाराला मे महिन्यात १४ लाखांनी तोट्यात गेले आहे. ग्रामीण भागात पन्नास टक्केच भारमान मिळत असून वाहतुकीचा खर्च अधिक झाला आहे. परिणामी मंडणगड आगाराचे चाक कमी भारमानाच्या चिखलात रुतत आहे.
मंडणगड आगारप्रमुख एम. बी. जुनिदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंडणगड आगारातून ४८ एसटी बसच्या १९७ फेऱ्या होतात. मे महिन्यात १४ हजार ५०० किमी प्रतिदिवस प्रवास होता. मात्र सवलत मूल्यांसह ३८ टक्केच भारमान राहिले आहे. प्रतिकिलोमिटर खर्च ५७ रुपये अपेक्षित असल्यामुळे आगाराला तोटा सहन करावा लागत आहे. ग्रामीण भागात इंधन आणि कर्मचारी असा ३८ रुपये प्रतिकिमी खर्च होत असताना तो १९ रुपये प्रतिकिमी भारमान राहत आहे. परिणामी आगार हे कमी भारमानामुळे तोट्यात येत आहे.
मंडणगड तालुका डोंगराळ असून तालुक्यातील अनेक ग्रामस्थ नोकरी व्यवसायासाठी मुंबई, नालासोपारा, बोरिवली परिसरात वास्तव्यास आहेत. या प्रवाशांसाठी एसटी हा प्रमुख आणि सोयीस्कर प्रवासाचा पर्याय आहे. मंडणगड बसस्थानकातून सकाळी ६ वाजता सुटणारी मंडणगड-मुंबई, ८.१५ वाजताची मंडणगड-बोरिवली, तसेच सायंकाळी ५ वाजताची मंडणगड-मुंबई या तिन्ही फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. या फेऱ्या बंद केल्या नसल्याचे आगारप्रमुखांनी सांगितले. मात्र त्यांचे भारमनातून खर्च आणि अपेक्षित उत्पन्न येत नसल्याचे त्यांनी सांगितले.
----
वेळापत्रक पाळल्यास भारमान वाढेल
योग्य वेळापत्रक न पाळल्यामुळेच प्रवासी कमी मिळत आहेत. त्यामुळे कमी प्रवासी हे कारण देत बस बंद करण्याचे कारणच चुकीचे आहे. अनियमित वेळापत्रकामुळे मुंबईकडे जाणाऱ्या नोकरदार, विद्यार्थी, कामगार आणि वरिष्ठ नागरिकांची गैरसोय होत आहे. यावर गांभीर्यपूर्वक विचार व्हावा अशी मागणी प्रवासी करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

Mumbai News: कबुतरांना खाद्य देण्यावर निर्बंध, तरीही लोकं ऐकेनात; आता पालिका राबवणार विशेष मोहीम

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला दिल्ली उच्च न्यायालयाचा जबरदस्त झटका!

IND vs ENG 2nd Test : ३० चौकार, ३ षटकार! शुभमन गिलचे त्रिशतक थोडक्यात हुकले; पठ्ठ्याने इंग्लंडचे मैदान गाजवले, भारताचा धावांचा डोंगर

Pune News : महिला कर्मचाऱ्याने कामाला लावण्यासाठी सुमारे २५ जणांकडून हजारो रुपये उकळले; चौकशी केली, पण अहवाल अर्धवट

SCROLL FOR NEXT