कोकण

जि. प. चा वित्त विभाग रिक्त पदांनी बेजार

CD

swt118.jpg

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद

जिल्हा परिषद वित्त विभाग
रिक्त पदांनी बेजार
प्रभारीही कमजोरः गतिमान कारभाराला ‘ब्रेक’
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १ ः सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा वित्त विभाग रिक्त पदांनी बेजार झाला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी नियमित मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांना थेट कार्यमुक्त केल्यानंतर ज्यांच्याकडे याचा अतिरिक्त कारभार देण्यात आला, ते सहाय्यक मुख्य लेखा व वित्त अधिकारी बाळासाहेब पाटील ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाले. मात्र, त्यांच्या जागी शासनाने दुसऱ्या अधिकाऱ्याची नियुक्ती न केल्याने सध्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा आर्थिक कारभार पाहणारा वित्त विभाग अडचणीत आला आहे. याशिवाय एकही लेखाधिकारी नसल्याने जलजीवन मिशनच्या लेखाधिकाऱ्यांकडे अतिरिक्त कारभार देण्यात आला आहे.
जिल्हा परिषदेवर प्रशासक आल्याने राज्यात अग्रक्रमाने काम करणारी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद ‘आजारी’ पडल्याचे दिसत आहे. प्रशासक आपली भूमिका चोख बजावत नसल्याने जिल्हा परिषद नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात मागे पडत असल्याचे मागील तीन वर्षांतील चित्र आहे. त्यातच अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याने एकमेकांच्या उणिवा काढण्यात अधिकारी व्यस्त दिसतात. त्यातच अनेक अधिकाऱ्यांची रिक्त पदे भर पाडीत आहेत. आतातर कहरच झाला आहे. जिल्हा परिषदेचा मुख्य विभाग असलेला वित्त विभाग ‘व्हेंटिलेटर’वर आहे. या विभागाला ना मुख्य लेखा व वित्त अधिकारी आहे, ना सहाय्यक लेखा व वित्त अधिकारी. या शिवाय अन्य दोन लेखाधिकारी ही पदे मंजूर असताना भरलेली नाहीत.
मनमानी कारभार, वरिष्ठांचे आदेश टाळणे अशी अनेक कारणे देत जिल्हा परिषदेच्या नियमित मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांनी १ मे २०२५ ला परस्पर कार्यमुक्त केले. त्यामुळे हे पद रिक्त झाले होते. त्यामुळे त्यांचा अतिरिक्त कारभार तत्कालीन उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी बाळासाहेब पाटील यांच्याकडे देण्यात आला. श्री. पाटील यांना २९ मेस मुख्य लेखा व वित्त अधिकारीपदी बढती मिळाली. मात्र, ते ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाले. त्यामुळे एकाच वेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी तसेच उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी ही दोन महत्त्वाची पदे रिक्त झाली. याच दरम्यान राज्याने लेखा अधिकाऱ्यांच्या राज्यस्तरीय बदल्या केल्या. त्यात जिल्हा परिषदेकडे कार्यरत असलेल्या रिजवान पिंपरी यांची पुणे महानगरपालिकेत बदली झाल्याने हे लेखाधिकारी पद रिक्त झाले. या शिवाय दुसऱ्या लेखाधिकाऱ्यांची पदोन्नती झाल्याने त्यांचीही बदली झाली. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत सध्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी तसेच उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी ही दोन महत्त्वाची पदे रिक्त असताना दोन्ही लेखाधिकारी पदे रिक्त झाली आहेत.
जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांना, पंचायत समित्यांना सहाय्यक लेखाधिकारी पुरविणाऱ्या वित्त विभागाला स्वतःकडे अधिकारी नसण्याची नामुष्की ओढवली आहे. मुख्य दोन पदांसह दोन्ही लेखाधिकारी पदे रिक्त असल्याने जलजीवन मिशन विभागाकडे कार्यरत असलेल्या लेखाधिकारी यांच्याकडे जिल्हा परिषदेच्या वित्त विभागाचा कारभार देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेची सध्या दयनीय अवस्था झाली आहे. जिल्हा परिषदेचा गतिमान कारभार सध्या रोखला गेला आहे. झालेल्या खर्चाची बिले काढण्यासाठी सक्षम आणि पुरेशी यंत्रणाच उपलब्ध नाही. त्यामुळे रिक्त पदांनी बेजार झालेल्या जिल्हा परिषदेच्या अडचणींत आणखी वाढ झालेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'देश मनुस्मृती नव्हे, तर भीम स्मृती म्हणजेच संविधानानुसार चालेल'; वाजपेयींचा उल्लेख करत RSS च्या मेळाव्यात काय म्हणाले माजी राष्ट्रपती?

Tea Tasting Course: चहा प्रेमींसाठी आनंदाची बातमी! 'टी टेस्टिंग' कोर्स आता उपलब्ध; जाणून घ्या अर्ज कसा करायचा

IND vs WI 1st Test Live: बॅटच्या 'फुगीर' भागाने केला घात, जॉन कॅम्बेल नाट्यमयरित्या बाद; जसप्रीत बुमराहच्या चेंडूवर असं काय घडलं?

Solapur Flood:'महापुरचं पाणी आेसरलं डाेळ्यातील नाही'; सीना नदीकाठच्या २० गावांना महापुराचा फटका, आरोग्याचा प्रश्‍न गंभीर

Dasara 2025 Vastu Tips: दसऱ्याला 'या' वस्तू उधार घेतल्याने होतो वास्तू दोष, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT