कोकण

जयेश थत्ते यांचा सन्मान

CD

मुंबई विद्यापीठात
जयेश थत्तेंचा सन्मान
चिपळूण : शहरातील पाग येथील भालचंद्र (चंदू) थत्ते यांचे सुपुत्र जयेश थत्ते याने मुंबई विद्यापीठाच्या बी.ई. (कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग-एआयएमएल) या शाखेत उल्लेखनीय यश मिळवले आहे. त्याचा समावेश विद्यापीठाच्या पहिल्या दहामध्ये झाला आहे. त्याला ९.५ ग्रेड मिळाली आहे. जयेशची शैक्षणिक कारकीर्द अत्यंत उत्तम आहे. चेन्नई येथे सीबीएससी पॅटर्नमध्ये दहावीला त्याला ९५ टक्के, तर बारावीला ९६.६ टक्के गुण मिळाले होते. पदवीच्या टप्प्यावरही त्याने आपली गुणवत्ता सिद्ध करत उच्च स्थान पटकावले. त्याच्या या यशामागे वडील भालचंद्र (चंदू) थत्ते यांची प्रेरणा आहे. मेकॅनिकल इंजिनिअर असलेल्या थत्ते यांनी चिपळूण व चेन्नई येथील आघाडीच्या कंपन्यांत अधिकारी पदांवर उल्लेखनीय कारकीर्द बजावली आहे.

महाराष्ट्र साहित्य परिषद
चिपळूण शाखाध्यक्ष गोणबरे
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण : महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे या राज्यातील आद्य आणि अग्रणी साहित्य संस्थेच्या चिपळूण शाखेच्या अध्यक्षपदी प्रा. संतोष गोणबरे यांची, तर कार्याध्यक्षपदी धीरज वाटेकर यांची निवड करण्यात आली आहे. लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या बाळशास्त्री जांभेकर सभागृहात नुकतीच मसापच्या चिपळूण शाखेची सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठीची नवी कार्यकारिणी एकमताने निश्चित करण्यात आली. या नवीन कार्यकारिणी उपाध्यक्षपदी प्रा. सोनाली खर्चे, मनीषा दामले, कार्यवाह- प्राची जोशी, कोषाध्यक्ष- प्रकाश घायाळकर, समित्या- स्पर्धा समिती- रवींद्र गुरव, प्रदीप मोहिते, दीपक मोने, कार्यक्रम समिती- शिवाजी शिंदे, प्रकाश गांधी, समीर कोवळे, कैसर देसाई, वाङ्मय समिती- मुझफ्फर सय्यद, महम्मद झारे, स्नेहा ओतारी. मराठी भाषा, साहित्य, समीक्षा आणि संस्कृतीच्या जतन व संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या या संस्थेच्या माध्यमातून चिपळूण शाखेतून आगामी काळात विविध साहित्यविषयक स्पर्धा, परिसंवाद, चर्चासत्रे व सांस्कृतिक उपक्रम राबविण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. यावेळी मसाप कोकण विभागाचे प्रतिनिधी आणि ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश देशपांडे, समीक्षक अरुण इंगवले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे अध्यक्ष राष्ट्रपाल सावंत, लोटिस्माचे उपाध्यक्ष सुनील खेडेकर आदी उपस्थित होते.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

Mumbai News: कबुतरांना खाद्य देण्यावर निर्बंध, तरीही लोकं ऐकेनात; आता पालिका राबवणार विशेष मोहीम

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला दिल्ली उच्च न्यायालयाचा जबरदस्त झटका!

IND vs ENG 2nd Test : ३० चौकार, ३ षटकार! शुभमन गिलचे त्रिशतक थोडक्यात हुकले; पठ्ठ्याने इंग्लंडचे मैदान गाजवले, भारताचा धावांचा डोंगर

Pune News : महिला कर्मचाऱ्याने कामाला लावण्यासाठी सुमारे २५ जणांकडून हजारो रुपये उकळले; चौकशी केली, पण अहवाल अर्धवट

SCROLL FOR NEXT