-rat२८p१०.jpg-
२५N७३७५९
केतन दुधाणे
-----
भडकंबा उपसरपंचपदी दुधाणे
साखरपा, ता. २: नजीकच्या भडकंबा गावाच्या उपसरपंचपदी केतन दुधाणे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. विद्यमान उपसरपंच बापू शिंदे यांनी राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झाले होते.
दुधाणे हे युवा नेतृत्व म्हणून परिसरात परिचित आहेत. साखरपा गावात मेडिकल व्यावसायिक म्हणून कार्यरत असताना त्यांनी युवासेनेचे कार्यकर्ते म्हणून राजकीय कारकिर्दीला प्रारंभ केला. गावात विविध योजनांचा लाभ त्यांनी अनेक ग्रामस्थांना मिळवून दिला आहे. दुधाणे यांची उपसरपंचपदी झालेल्या निवडीबद्दल माजी सभापती जयसिंग माने, जिल्हा परिषद माजी सदस्य बापू शेटये, सरपंच सिद्धी कदम, शेखर आक्टे, सदस्य संतोष जामसंडेकर, अंतरा भोसले, तंटामुक्ती अध्यक्ष रवींद्र दुधाणे, बापू शिंदे आदींनी त्यांचे अभिनंदन केले.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.