शैक्षणिक साहित्याचे
पडवेत वाटप
गुहागर : तालुक्यातील पडवे जिल्हा परिषद केंद्रशाळेत ग्रामपंचायतीतर्फे विद्यार्थ्यांना सरपंच मुजीब जांभारकर, सदस्य रफिक सारंग आणि शाळा व्यवस्थापन समिती सदस्य अमानत जांभारकर यांच्या हस्ते शालेय बॅग व वह्या वाटप करण्यात आले. या वेळी मुख्याध्यापक मुहम्मद कारबारी, वरिष्ठ शिक्षक रमजान जांभारकर, पदवीधर शिक्षक दाऊद जांभारकर आदी उपस्थित होते.
खोडदे-निवातेवाडीत
शैक्षणिक साहित्य वाटप
गुहागर ः बाळासाहेब खेतले प्रतिष्ठानतर्फे खोडदे-निवातेवाडी शाळेत मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना वह्या, पेन-पेन्सिल व अन्य शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी महेंद्र मोरे, विष्णू घाणेकर, संजय ठोंबरे, रवींद्र निवाते, विजय निवाते, पांडुरंग निवाते, प्रेम ठोंबरे, प्रतीक निवाते, प्रणव डिंगणकर, तुकाराम निवाते, मधुकर गोणबरे, मनस्वी मोरे, पूर्वा घाणेकर, पूजा निवाते, अपूर्वा निवाते, अवंतिका कावणकर, गीता निवाते आदींनी सहकार्य केले.
मुख्याध्यापकपदी
मुनवरा तांबोळी
रत्नागिरी ः शहरातील मिस्त्री हायस्कूलच्या मुख्याध्यापकपदी कार्यरत असलेले महंमदझुबेर आदम गडकरी सेवानिवृत्त झाल्यानंतर रिक्तपदी मुनवरा तांबोळी यांची नियुक्ती झाली आहे. तालिमी इम्दादिया संस्थेतर्फे नवनियुक्त मुख्याध्यापिका तांबोळी यांचे अभिनंदन करण्यात आले. त्यांचे सहसचिव शकील मजगावकर, खजिनदार जाहीर मिस्त्री यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते अलिमियाँ काझी, सागर पाटील, आत्माराम मेस्त्री, सी. एस. पाटील, सचिन मिरगल, माजी नगरसेवक सुहेल मुकादम यांच्यासह पर्यवेक्षक मुशताक आगा आणि शिक्षकांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.