कोकण

कुडाळात रविवारी पारितोषित वितरण

CD

कुडाळात रविवारी
पारितोषित वितरण
कुडाळः गुरुकुल एज्युकेशन सोसायटीच्या प्रज्ञाशोध परीक्षेचा बक्षीस वितरण कार्यक्रम रविवारी (ता. ६) सकाळी १० वाजता मराठा समाज हॉल कुडाळ येथे आयोजित केला आहे. मागील शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये घेतलेल्या प्रज्ञाशोध परीक्षेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांपैकी गुणवंत विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात सन्मानित करण्यात येणार आहे. या परीक्षेत राज्य व जिल्हा गुणवत्ता यादी आलेले तसेच सर्व तालुक्यातील प्रथम तीन क्रमांकाचे विद्यार्थी अशा एकूण ४५५ विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी संपर्क करावा, असे आवाहन गुरुकुल एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर या संस्थेने केले आहे.
..................
भाजप कार्यकर्त्यांतर्फे
जामसंडेत आनंदोत्सव
देवगडः रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल येथील तालुका भाजपच्या वतीने जामसंडे येथील पक्ष कार्यालयासमोर आनंद व्यक्त करण्यात आला. फटाके फोडण्याबरोबरच लाडू वाटप करण्यात आले. यावेळी माजी आमदार अ‍ॅड. अजित गोगटे, बाळ खडपे, सदाशिव ओगले, सुनील पारकर, प्रियांका साळसकर उपस्थित होते.
.................
ओटवणेत झाड पडून
वाहतूक विस्कळीत
ओटवणेः ओटवणे-कारिवडे या मार्गावरील ओटवणे गावठणवाडी शाळा क्र. १ येथे भले मोठे झाड मोडून रस्त्यावर पडल्याने वाहतूक काही तास बंद होती. रात्री साडेबाराच्या सुमारास हे झाड कोसळून रस्त्यावर पडले. यामुळे वीजवाहिन्यांसह रस्त्यावर पडून खांब वाकडे झाले. गावठणवाडी परिसरातील हा भाग दैनंदिनी वर्दळीचा आहे. रात्री घडलेल्या घटनेवेळी वाहतूक नसल्याने अनर्थ टळला. सकाळी ७ च्या सुमारास ग्रामस्थ प्रकाश गावकर, आनंद गावकर, आबा भानसे, बापू गावकर यांच्या सहकार्याने झाड हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली. ओटवणे वायरमन समीर सावंत यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत सकाळी ११ वाजेपर्यंत वीजपुरवठा सुरळीत केला.
.....................
झोळंबे मंदिरात
धार्मिक कार्यक्रम
कोलझरः वासुदेव महाराज यांच्या आश्रयाखाली चालत आलेल्या श्री पांडुरंग मंदिरात आषाढ एकादशी कार्यक्रमास शनिवारपासून (ता. ५) प्रारंभ होणार आहे. शनिवारी रात्री ८ वाजता हरिपाठाने कार्यक्रमाची सुरुवात होईल. नंतर श्री दत्ताराय चारी बालभजन मंडळाचे भजन, रविवारी (ता. ६) पहाटे ५ वाजता काकड आरती, सकाळी भजन, दुपारी ११ वाजता शारदा आरोंदेकर हिचे नारदीय कीर्तन, सायंकाळी ४ वाजता वारकरी कीर्तन, ७ वाजता हरिपाठ, श्री विश्वास मेस्त्री आणि सहकारी यांची अभंगवाणी, रात्री ग्रामस्थांची भजने, सोमवारी (ता. ७) पहाटे ५ वाजता काकड आरती, महापूजा आणि भजने, सकाळी ११ वाजता दिंडी, दुपारी महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025 India Squad: वर्ल्ड कपच्या भारतीय संघात शफाली वर्माला स्थान का नाही? निवड समिती अध्यक्षांनी सांगितलं खरं कारण

ISRO: 'इस्रो'कडून होतेय ४० मजली उंचीच्या यानाची निर्मिती; अध्यक्ष व्ही. नारायण यांनी दिली सखोल माहिती

Georai Crime : 'त्या' मायलेकीच्या मृत्यूचे कारण आले समोर; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल, पतीला अटक

Maharashtra Heavy Rain Update : मुसळधार पावसाचा फटका! जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय, शाळा- कॉलेज बंद, पण कुठे?

Mumbai Rain Update: मुंबईकरांनो सतर्क राहा! पावसाचा जोर वाढणार, आयएमडीचा अंदाज

SCROLL FOR NEXT