-rat२p३९.jpg-
२५N७४८०९
रत्नागिरी : हत्तीचे भलेमोठे कातळशिल्प आणि त्याच्यासोबत अन्य कातळचित्रांचा समूह.
---
‘जागतिक पुरातत्त्वा’त कोकणातील कातळशिल्पे
चार शोधनिबंधांचे सादरीकरण; आंतरराष्ट्रीय स्तरावर आश्वासक पाऊल
मकरंद पटवर्धन : सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २ : जागतिक पुरातत्त्व काँग्रेसद्वारा आयोजित डार्विन, ऑस्ट्रेलिया येथे झालेल्या दहाव्या आंतरराष्ट्रीय परिषदेत कोकणातील कातळशिल्प या विषयावर आधारित चार शोधनिबंधांचे सादरीकरण करण्यात आले. कोकणातील कातळशिल्प आणि वारसा संशोधन केंद्राच्या रत्नागिरी टीमतर्फे तीन शोधनिबंधांचे ऑनलाइन व कोळोशी अश्मयुगीन गुहा पुरातत्वीय उत्खनन टीमतर्फे ऑस्ट्रेलियात जाऊन एका शोधनिबंधाचे सादरीकरण केले आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर कोकणातील कातळशिल्पांचे आश्वासक पाऊल पडले आहे.
रत्नागिरीत कातळशिल्प, शोध व संशोधनासाठी शोधकर्ते सुधीर रिसबूड, धनंजय मराठे, डॉ. सुरेंद्र ठाकुरदेसाई यांनी २०१२ पासून सुरुवात झाली. २०१५ पासून कातळशिल्प मिळायला सुरुवात झाली. शोधकर्त्यांनी एकेक कार्यकर्ते जोडले आणि गेल्या २०० पेक्षा अधिक ३००० च्या घरात चित्रे सापडली आहेत. त्यानंतर कातळशिल्पांचे जागतिक वारसास्थळासाठी नामांकन झाले. रत्नागिरीत वारसा संशोधन केंद्र सुरू झाले, ही मोठी घडामोड आहे.
संथ आणि सुरक्षित गतीने रॉक आर्ट संशोधन आणि सराव, पुरातनता आणि सातत्य, दस्तऐवजीकरण, पुरातनता आणि सहसंबंध आणि व्यापार, स्थलांतर, वसाहत-नेटवर्क या चार संकल्पनांवर शोधनिबंधांचे सादरीकरण करण्यात आले. टीममधील तरुण अभ्यासकांनी संशोधन निबंध सादरीकरण करावे, या विचारातून दिव्यांश सिन्हा, तार्किक खातू यांनी टीम कोकणातील कातळशिल्प आणि वारसा संशोधन केंद्राच्यावतीने कोकणातील कातळशिल्प या विषयावर शोधनिबंधाचे ऑनलाइन सादरीकरण केले. आतापर्यंत झालेले काम हे पूर्णपणे लोकसहभागातून झाले आहे. त्याचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचे होते. त्याबाबतचे वाचन निसर्गयात्री संस्थेच्या सभासदांच्यावतीने ऋत्विज आपटे यांनी केले.
कोळोशी टीमच्यावतीने प्रा. पार्थ चौहान यांनी कोळोशी अश्मयुगीन गुहा उत्खनन या विषयावर प्रत्यक्ष ऑस्ट्रेलिया येथे जाऊन शोधनिबंधाचे सादरीकरण केले. सातत्याने अखिलेश झा, डॉ. तेजस गर्गे, डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई यांनी पाठबळ दिले.
------------
कोट
या आंतरराष्ट्रीय परिषदेत कोकणातील कातळशिल्प या विषयावर आधारित शोधनिबंध सादरीकरणाची संधी मिळाली, याचा आनंद आहे. या शोधनिबंधाद्वारे कातळशिल्प, संबंधित पुरावे आणि कालखंड अधोरेखित करण्यात आले. जागतिक पटलावर एकावेळी विविध आयामांनी सादर केलेल्या कातळशिल्प विषयाला अत्यंत व्यापक व सकारात्मक प्रतिसाद मिळाला.
- सुधीर रिसबूड.
---
दोन हजार जणांचा सहभाग
१९८६ पासून दर चार वर्षांनी ही परिषद भरवली जाते. ऑस्ट्रेलियातील फ्लिंडर्स विद्यापीठ आणि डार्विन विद्यापीठ या ठिकाणी याचे आयोजन यंदा केले. जगभरातून दोन हजारांहून अधिक अभ्यासक, विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी यात भाग घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.