कोकण

ः२४ सदस्यांची सायकलवरून पंढरपूरची वारी

CD

-rat२p४७.jpg-
२५N७४८२९
चिपळूण ः पंढरपूरच्या सायकलवारीत सहभागी झालेले चिपळूण सायकलिंग क्लबचे सदस्य.
----
‘सायकलिंग क्लब’ची पंढरपूर वारी
एकत्रित २४ सदस्यांचा सायकल प्रवास ; अडचणींवर मात
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २ ः चिपळूण सायकलिंग क्लबच्या २४ सदस्यांनी सलग तिसऱ्या वर्षी चिपळूण ते पंढरपूर ही सायकलवारी यशस्वीरीत्या पूर्ण करून एक अविस्मरणीय आणि प्रेरणादायी कामगिरी बजावली. शेकडो किलोमीटरचा हा प्रवास केवळ शारीरिक क्षमतेची कसोटी नव्हता तर श्रद्धा, जिद्द आणि संघभावनेचा अद्वितीय संगम ठरला.
यावर्षीच्या वारीला आयोजक प्रसाद अलेकर व विक्रांत अलेकर यांच्या घरापासून सुरुवात झाली. शिवसृष्टी येथे पहिला थांबा घेऊन सायकल रिंगण करण्यात आले. त्यानंतर पृथ्वी पाटील यांच्या शिवगर्जनेने आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने वारीला खऱ्या अर्थाने गती मिळाली. वारीचा पहिला दिवस चिपळूण ते विटा असा १४० किलोमीटरचा होता. वाटेत उन्हाचा तडाखा, चढ-उतार, थकवा आणि तांत्रिक अडचणी असूनही सर्व सदस्यांनी एकत्रितपणे हा प्रवास केला. रात्री विटा येथे त्यांनी विश्रांती घेतली. दुसऱ्या दिवशी विटा ते पंढरपूर असा ११६ किलोमीटरचा प्रवास करत ते विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल झाले. या वारीत अनेक अडचणींचा सामना करावा लागला. ऊन, वारा, पाऊस, कुंभार्ली घाटातील खराब रस्ते, सायकलचे पंक्चर या सर्व अडथळ्यांवर मात करत वारकरी ज्ञानोबा-तुकारामच्या गजरात पंढरपुरात पोहोचले. विठ्ठलाच्या चरणी वंदन केले. या प्रेरणादायी सायकलवारीत क्लबचे सहसचिव प्रसाद अलेकर, अध्यक्ष विक्रांत अलेकर, उपाध्यक्ष प्रशांत दाभोळकर, मनोज भाटवडेकर, कार्यकारिणी सदस्य योगेश ओसवाल, स्वप्नील गायकवाड, अमित पेडणेकर, मनोज नितोरे, डॉ. सचिन खेडेकर, चैतन्य गांगण, संदीप राणे, शौरी राणे, अंकुश जंगम, राघव खर्चे, पृथ्वी पाटील, अजित जोशी, श्रीकांत जोशी, हेमंत भोसले, अथर्व भोसले, संजयकुमार कदम, राजेंद्र नाचरे, सुयोग शिंदे, सुयोग पटवर्धन, बंटी सावंत या २४ जणांनी सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

Mumbai News: कबुतरांना खाद्य देण्यावर निर्बंध, तरीही लोकं ऐकेनात; आता पालिका राबवणार विशेष मोहीम

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला दिल्ली उच्च न्यायालयाचा जबरदस्त झटका!

IND vs ENG 2nd Test : ३० चौकार, ३ षटकार! शुभमन गिलचे त्रिशतक थोडक्यात हुकले; पठ्ठ्याने इंग्लंडचे मैदान गाजवले, भारताचा धावांचा डोंगर

Pune News : महिला कर्मचाऱ्याने कामाला लावण्यासाठी सुमारे २५ जणांकडून हजारो रुपये उकळले; चौकशी केली, पण अहवाल अर्धवट

SCROLL FOR NEXT