कोकण

धनगर मल्हार सेना मालवण तालुकाध्यक्षपदी नवनाथ झोरे

CD

swt330.jpg
75044
नवनाथ झोरे

मल्हार सेना मालवण तालुकाध्यक्षपदी झोरे
मालवण : सकल धनगर मल्हार सेनेच्या मालवण तालुकाध्यक्षपदी नवनाथ झोरे यांची नियुक्ती केली आहे. सकल धनगर मल्हार सेनेचे संस्थापक अध्यक्ष प्रल्हाद सोरमोरे यांनी नियुक्तीपत्र श्री. झोरे यांना दिले. धनगर समाज राजकीय दृष्ट्या सक्रिय आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने ही संस्था कार्यरत आहे. संस्थेचे मुख्य कार्यालय छत्रपती संभाजी नगर येथे आहे. नवनाथ झोरे यांचे सामाजिक कार्यातील सक्रिय सहभागाची नोंद घेऊन त्यांची तालुकाध्यक्षपदी निवड केली आहे. देश स्वतंत्र होऊन ७५ वर्षाहून अधिक काळ लोटला तरीही काही ठिकाणी अजूनही वीज, रस्ते या मूलभूत सुविधापासून वंचित आहे. कुठे तरी या समाजावर अन्याय होत असल्याची भावना असून तालुक्यातील वाड्या वस्त्यामध्ये फिरून तिथल्या समाजाच्या अडचणी समजून घेणार आणि त्या सरकारसमोर मांडणार तसेच काही ठिकाणी धनगर वस्त्यांना आजही रस्ते, वीज, पाणी नाही या मूलभूत सुविधावर लक्ष केंद्रित करून या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे झोरे यांनी सांगितले.
--------------
swt331.jpg
75045
मुंबई ः रवींद्र चव्हाण यांचे अभिनंदन करताना अन्वेशा आचरेकर व महिमा मयेकर.

आचरेकर, मयेकरांकडून चव्हाणांचे अभिनंदन
मालवण : भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी जिल्ह्याचे सुपुत्र आमदार रवींद्र चव्हाण यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर भाजप मालवण शहर महिला आघाडीच्यावतीने शहराध्यक्ष अन्वेशा आचरेकर व शहर चिटणीस महिमा मयेकर यांनी त्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. आमदार चव्हाण यांचे कार्यक्षेत्र डोंबिवली असले तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपा मजबूत करण्यात त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. त्यांची भाजपा प्रदेशाध्यक्ष पदी झालेली निवड जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणारी असल्याची प्रतिक्रिया सौ. आचरेकर यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शक्तीचा महाराष्ट्राच्या किनारपट्टीला धोका नाही, पण मराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता; IMDने दिला इशारा

Crime News: अमेरिकेतील डल्लासमध्ये भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या; हैदराबादच्या चंद्रशेखर पोलच्या मृत्यूने भारतात हळहळ

Latest Marathi News Live Update: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज अहिल्यानगर दौऱ्यावर

Sakal Premier League : 5 नोव्हेंबरपासून 'सकाळ प्रिमिअर लीग'चा थरार; विजेत्या संघाला तीन लाखांचा पुरस्कार, ३२ संघ होणार सहभागी

PMC Elections : कोठे तक्रारींची दखल; कोठे राजकीय सोय, अंतिम प्रभागरचना जाहीर; इच्छुकांच्या नजरा आरक्षणाच्या सोडतीकडे

SCROLL FOR NEXT