‘कुडाळला गटविकास अधिकारी नियुक्त करा’
कुडाळः कुडाळ पंचायत समितीला गेले काही दिवस कायमस्वरुपी गटविकास अधिकारी नसून ही बाब तालुक्यासाठी भूषणावह नाही. तरी गटविकास अधिकारी नियुक्त करावा, अशी मागणी युवासेना कुडाळ तालुकाप्रमुख योगेश धुरी यांनी केली आहे. गेले कित्येक दिवस कायमस्वरुपी गटविकास अधिकारी नसल्याने अनेक अडचणी येत आहेत. गेल्या काही दिवसांत दोन ते तीन प्रभारी गटविकास अधिकारी बदलले. त्यामुळे खातेबदल सही बदल करण्यात तीन-चार दिवस जातात. त्यातच दुसरा प्रभारी गटविकास अधिकारी नियुक्त होतो. सद्यस्थितीत तर अधिकारीच जाग्यावर नसल्याने लोकांची गैरसोय होत आहे. तालुक्याला गटविकास अधिकारी नसणे ही बाब कुडाळवासियांसाठी योग्य नाही. आता जे प्रभारी गटविकास अधिकारी आहेत, ते अनेक दिवस कार्यालयाकडे फिरकलेच नाहीत, याकडे धुरी यांनी लक्ष वेधले आहे.
................
swt33.jpg
7522
चेंदवण ः श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालयात शालेय संसद निवडणूक घेण्यात आली.
चेंदवणमध्ये शालेय संसद निवडणूक
कुडाळः तालुक्यातील श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय चेंदवण प्रशालेत शालेय संसद निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत विद्यार्थ्यांनी उमेदवारी अर्ज भरणे, अर्ज छाननी करणे, मागे घेणे, प्रचार करणे आणि प्रत्यक्ष निवडणूक व मतदान केले. मतदानासाठी ओळखपत्र म्हणून आधारकार्ड व शालेय ओळखपत्र ग्राह्य धरण्यात आले. मतदार अधिकारी म्हणून विद्यार्थी नेमण्यात आले. मतदार केंद्राध्यक्ष श्रीमती भोसले यांनी, झोनल ऑफिसर उमेश धर्णे, मतमोजणीसाठी शरद नाईक, विजय कांबळी, श्रीमती कांबळी, सुप्रिया चेंदवणकर, संतोष सांगळे यांनी काम पाहिले. मुख्याध्यापक माणिक पवार, शाळा समिती अध्यक्ष देवेंद्र नाईक, सिद्धी शिरसाट, उर्मिला गवस व पालक संदीप चेंदवणकर यांनी मतदान केंद्रावर भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
...................
swt31.jpg
75227
कुडाळ ः वृक्षारोपण करताना एस.आर.एम. कॉलेजच्या प्राचार्या डॉ. स्मिता सुरवसे. बाजूला अनंत वैद्य, सुरेश चव्हाण आदी. (छायाचित्र ः अजय सावंत)
कुडाळ हायस्कूलमध्ये वृक्षारोपण अभियान
कुडाळः कृषी दिनाचे औचित्य साधून क.म.शि.प्र. मंडळाच्या कुडाळ हायस्कूल ज्युनिअर कॉलेजमध्ये हरित सेना विभागाच्या वतीने वृक्ष लागवड करण्यात आली. याप्रसंगी संत राऊळ महाराज कॉलेजच्या प्राचार्या डॉ. स्मिता सुरवसे यांची प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थिती लाभली. मंडळाचे उपकार्याध्यक्ष अरविंद शिरसाट, सरकार्यवाह अनंत वैद्य, सीईओ सुरेश चव्हाण, उपाध्यक्ष का. आ. सामंत, मुख्याध्यापक विपिन वराडे, उपमुख्याध्यापक प्रवीण भोगटे, पर्यवेक्षक रंजन तेली आदी उपस्थित होते. माजी मुख्यमंत्री, हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्ताने कुडाळ हायस्कूलमध्ये दरवर्षी कृषी दिनाचे आयोजन केले जाते. मान्यवरांच्या हस्ते सुरंगी आणि सुपारी, आवळा झाडांचे रोपण करण्यात आले. पर्यावरणरक्षण, वृक्षप्रेम, श्रमप्रतिष्ठा आणि शेतकऱ्यांविषयी आत्मियता याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. दुपारच्या सत्रात प्रार्थनेच्या वेळी प्रवीण भोगटे यांनी मुलांना कृषी दिनाचे महत्त्व सांगितले. याप्रसंगी पी. बी. कदम, संदीप प्रभू, सनी चव्हाण, मनोज गोसावी, जनार्दन डोर्लेकर, सूर्यकांत गोसावी, विनायक पाटकर तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
..................
swt36.jpg
75230
माड्याचीवाडी ः येथील बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी जिव्हाळा आश्रमाला भेट दिली. (छायाचित्र ः अजय सावंत)
पै स्कूलची ‘जिव्हाळा’ सेवाश्रमास भेट
कुडाळ ः बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी जिव्हाळा सेवाश्रमाला भेट देत प्रेरणादायी उपक्रमाद्वारे सामाजिक बांधिलकी जोपासली. प्रशाळेतील अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी २८ जूनला माड्याचीवाडी जिव्हाळा सेवाश्रमाला भेट देत आजी-आजोबांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी बारावीच्या हिंदी पाठ्यपुस्तकातील कवितांवर आधारित उपक्रम सादर केला. त्या अनुषंगाने आश्रमातील आजी-आजोबांसोबत वेळ घालवला. त्यांच्या मनातील प्रश्न विचारण्यात आले. त्यांची स्थिती जाणून घेत फळे, बिस्किटे व भेटवस्तू देण्यात आल्या. याप्रसंगी शाळेच्या शिक्षिका प्राजक्ता जाधव यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी समाजातील घटकांशी नाते जोडणे आवश्यक आहे. अशा उपक्रमातून माणुसकी, करुणा, सहानुभूती निर्माण होते, असे सांगितले. आश्रमाचे व्यवस्थापक संजय बिर्जे यांनी मार्गदर्शन केले. शाळेच्या शिक्षिका मधुरा इन्सुलकर आभार यांनी मानले. या उपक्रमासाठी संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलच्या प्राचार्या चैताली बांदेकर यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.