कोकण

घाडीगावकर यांचे गुरुवारी उपोषण

CD

घाडीगावकर यांचे
गुरुवारी उपोषण
सावंतवाडी ः सावंतवाडी प्रांताधिकारी आणि तहसीलदारांकडून आकसापोटी केलेल्या कारवाईविरोधात आंबोलीचे तत्कालीन ग्राममहसूल अधिकारी सुमित घाडीगावकर यांनी गुरुवारी (ता. १०) सकाळी १० वाजल्यापासून जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर बेमुदत उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी अनिल पाटील यांना दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, सावंतवाडीचे प्रांताधिकारी व तहसीलदारांकडून माझ्यावर आकसापोटी कारवाई करण्यात आली. तसेच, माझे एप्रिल २०२५ पासूनचे वेतन गोठविले आहे. त्यामुळे माझ्यावर व माझ्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. या कारवाईविरोधात १० जुलैला सकाळी १० वाजता जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या प्रवेशद्वारावर बेमुदत उपोषणास बसणार आहे.
-------
कणकवलीत गुरुवारी
गुरुपौर्णिमा उत्सव
कणकवली ः परमहंस भालचंद्र महाराज आश्रम येथे गुरुवारी (ता. १०) गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. पहाटे ५.३० पासून समाधी पूजन, काकड आरती, जपानुष्ठान, सकाळी ७ वाजता पाद्यपूजा, अभिषेक, १०.३० वाजता सत्यनारायण महापूजा, आरती, दुपारी १ वाजता तीर्थप्रसाद, महाप्रसाद, भजने, सायंकाळी ७ वाजता धुपारती, रात्री ८ वाजता बाबांची दैनंदिन आरती होणार आहे. ज्या भाविकांना पाद्यपूजा करायची आहे, त्यांनी आपली नावे बुधवारी (ता. ९) सायंकाळी ५ वाजेपर्यंत आश्रमात नोंदवावीत व सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन परमहंस भालचंद्र महाराज संस्थानने केले आहे.
............................
वजनकाटे मुद्रांकन
शिबिरे आजपासून
मालवण ः निरीक्षक वैध मापनशास्त्र सावंतवाडी विभागातर्फे वजनकाटे फेरपडताळणी व मुद्रांकन करण्यासाठी ७ जुलैला दोडामार्ग, ८ व ९ ला भेडशी, ११ व १२ जुलैला बांदा येथे शिबिर आयोजित केले आहे. सर्व व्यापाऱ्यांनी आपल्या वापरातील तराजू वजने, इलेक्ट्रिक काटे, काऊंटर काटे व इतर मुद्रांकन करण्यासाठी सकाळी ९ वाजता शिबिरात वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.
.........................
‘आयुष रुग्णालयाजवळ
एसटी बसला थांबा द्या’
सावंतवाडी ः धारगळ-गोवा येथील आयुष रुग्णालयात सिंधुदुर्गातून रुग्ण मोठ्या संख्येने जातात. मात्र, सिंधुदुर्गातून पणजीला जाणाऱ्या एसटी बस ‘आयुष’ पासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर थांबतात. हा थांबा रुग्णालयापासून जवळ द्यावा, अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख नारायण राणे यांनी एसटी आगारप्रमुखांकडे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nilesh Ghaiwal : 'या' बड्या नेत्याच्या मदतीने कुख्यात गुंड घायवळ परदेशात पळाला, माजी गृहमंत्र्यांचा आरोप

IND vs AUS : रोहित शर्मा संघात असेपर्यंत Yashasvi Jaiswal ला संधी मिळणे अवघड! ऑसींविरुद्ध कशी असेल भारताची Playing XI?

Latest Marathi News Live Update : सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, बाळा नांदगावकर यांची मागणी

Union Home Minister Amit Shah: अन्नधान्यातून इथेनॉल निर्मितीकडे वळावे: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा; केंद्र सरकार अर्थसहाय्य करायला तयार

हृदयद्रावक घटना! नदीत पडलेल्या मुलाला वाचवताना वडिलांचा दुर्दैवी अंत; बापाच्या त्यागाने चिमुकल्याचा जीव वाचला, पण...

SCROLL FOR NEXT