swt१४४.jpg
77413
सावंतवाडीः येथे पत्रकार परिषदेत बोलताना शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख संजू परब.
केसरकरांच्या वाढदिनानिमित्त विविध कार्यक्रम
१६ पासून प्रारंभः शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांची माहिती
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १४ः शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा माजी शालेय शिक्षणमंत्री आमदार दीपक केसरकर यांचा वाढदिवस शुक्रवारी (ता.१८) सायंकाळी सात वाजता येथील गोविंद चित्रमंदिर सभागृहात उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. तत्पूर्वी या निमित्ताने १६ पासून शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्राशी संबंधित विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
श्री. परब म्हणाले, ‘‘केसरकरांच्या वाढदिवसानिमित्त विशेषतः १६ पासून बॅ. नाथ पै सभागृहात नाट्यमहोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवात संयुक्त दशावतार आणि ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या ऐतिहासिक नाटकांचा समावेश आहे. याशिवाय विविध सामाजिक उपक्रमही राबवले जाणार आहेत. यामध्ये रुग्णालयांमध्ये फळवाटप, जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना खाऊवाटप, आरोस येथील दिव्यांग शाळेतील मुलांना कॅरम आणि बॅडमिंटन साहित्य वाटप तसेच गोरगरीब लोकांना धान्यवाटप इत्यादींचा समावेश आहे. या आधी वाढदिवस कार्यक्रम १६ ला होणार असल्याचे शिवसेनेच्या माध्यमातून जाहीर करण्यात आले होते. परंतु, ते रद्द करत १८ ला सायंकाळी सात वाजता हा कार्यक्रम गोविंद चित्र मंदिरमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला आमदार दीपक केसरकर हे उपस्थित राहणार असून कुडाळ मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून महायुतीचे पदाधिकारीही उपस्थित असतील. या कार्यक्रमासाठी येताना कोणीही पुष्पगुच्छ किंवा भेटवस्तू आणू नये.’’
चौकट
पाणीटंचाईबाबत तक्रारी नाहीत
माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी शहरातील काही भागात पाणीटंचाई असल्याचा आरोप केला होता. तशा प्रकारची बातमी मी वृत्तपत्रामध्ये वाचली. यानंतर मी स्वतः पालिकेशी संपर्क साधून खात्री केली असता शहरात कुठेही पाणीटंचाई नाही किंवा तशा प्रकारच्या लेखी तक्रार पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे प्राप्त झाली नसल्याचे समजले. त्यामुळे साळगावकर करत असलेले आरोप चुकीचे आहेत. शहराला पाणीपुरवठा करणारे पाळणेकोंड धरण पूर्णपणे भरले आहे, त्यामुळे शहराला पूर्वीपेक्षा मुबलक पाणीपुरवठा होत आहे, असा दावा श्री. परब यांनी यावेळी केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.