कोकण

आस्था फाउंडेशनच्या श्रवण, वाचादोष शिबिराला प्रतिसाद

CD

rat२३p६.jpg-
२५N७९३४३
रत्नागिरी : आस्था फाउंडेशनच्या श्रवण, वाचादोष शिबिरात छोट्या बाळाची तपासणी करताना तज्ज्ञ.

‘आस्था’तर्फे श्रवण, वाचादोष शिबिर
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २३ : येथील आस्था सोशल फाउंडेशनने श्रवण व वाचादोष असणाऱ्या सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले. त्यात जिल्ह्यातील २९ जणांनी सहभाग घेतला.
शिवाजीनगर येथील आस्था थेरपी सेंटरमध्ये शिबिर झाले. पवई येथील डॉ. एल. एच. हिरानंदानी हॉस्पिटलच्या सहकार्याने हे शिबिर झाले. जन्मतः व जन्मानंतर श्रवणदोष असणाऱ्या किंवा अस्पष्ट बोलणाऱ्या, बोलताना अडचण येणाऱ्या अशा सर्व बालकांसाठी व त्यांच्या पालकांसाठी, मोठ्या वयोगटातील व्यक्तींसाठी मोफत मार्गदर्शन शिबिर झाले. यात श्रवण व वाचादोषसंदर्भात तपासणी करण्यात आली. गरजेनुसार मोफत औषधे व चार दिव्यांगांना श्रवणयंत्र देण्यात आले. पालकांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.
शिबिरात कान, नाक, घसातज्ज्ञ डॉ. कश्मिरा चव्हाण व ऑडिओलॉजिस्ट प्राजक्ता भोगटे-सातवसे यांनी मुलांच्या ऐकण्यात व बोलण्यासंदर्भातील समस्यांबाबत मार्गदर्शन केले. ऑडिओलॉजिस्ट प्राजक्ता भोगटे-सातवसे यांच्यामार्फत गरजेनुसार ओएई, बेरा, पीटीओ या वैयक्तिक तपासण्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आस्था फिरते श्रवण चाचणी कक्षात ना नफा ना तोटा तत्त्वावर शुल्क आकारून करण्यात आल्या. शिबिराचे आयोजन स्पीच थेरपिस्ट संकेत चाळके व तांत्रिक साहाय्यक कल्पेश साखरकर यांनी काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Joe Root Test Records: इंग्लंडच्या 'रूट'चे कसोटीतील १२ विक्रम माहित्येय का? टीम इंडियाला त्याची भीती वाटण्याचं कारणच ते आहे

Narendra Modi and Nehru : ‘या’ दिवशी पंतप्रधान मोदी मोडणार नेहरूंचा सर्वात मोठा विक्रम!

विराट-रोहितनंतर भारताच्या आणखी एका स्टार खेळाडूने घेतली निवृत्ती; सोशल मीडियावर भावनिक पोस्ट...

Walmik Karad: कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झालेल्या मयुरी बांगर नेमक्या कोण? वाल्मिक कराडसाठी केलं होतं उपोषण

Latest Maharashtra News Updates : वांद्रे येथील पीव्हीआर, सिनेमागृहात शिवसेना शिंदे गटाकडून आंदोलन

SCROLL FOR NEXT