कोकण

रानभाज्यांच्या कमाईतून खरेदी केले वाद्य साहित्य

CD

79585

रानभाज्यांच्या कमाईतून
खरेदी केले वाद्य साहित्य
सावंतवाडी, ता. २४ ः रानभाज्या प्रदर्शन व विक्री जमा निधीतून झाराप कामळेवीर शाळेच्या मुलांनी 4200 रुपये किंमतीचा शाळेसाठी
वाद्य साहित्य खरेदी केले.
झाराप-कामळेवीर शाळेच्या रानभाज्या प्रदर्शन व विक्री या आनंदादायी शनिवार व स्काऊट गाईड अंतर्गत आलेल्या उपक्रमात मुलांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला. प्रत्येक मुलाने रानभाजी विकून स्व-कमाईतून जमलेल्या निधीतून शाळेची गरज ओळखून सर्व मुलांनी शाळेसाठी बेस ड्रम व कट्टर खरेदी करून शाळेच्या शिक्षकांकडे सुपूर्द केला. या वाद्यांचा उपयोग परिपाठ, संगीत कवयात व प्रभात फेरीसाठी करण्यात येणार आहे. मुलांच्या या आगळ्या वेगळ्या व समाजाला एक नवा आदर्श घालून देणाऱ्या उपक्रमाचे शाळा व्यवस्थापन समिती, पालक व ग्रामस्थ तसेच सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. या उपक्रमास शाळेचे मुख्यध्यापक कदम, निरवडेकर, राऊळ, साळगावकर व गोठोस्कर यांचे मार्गदर्शन लाभले.
---------------
79587

श्रीनिवास नार्वेकरांचे २७ ला
सावंतवाडी येथे व्याख्यान
सावंतवाडी, ता. २४ः व्यक्तिमत्त्व विकासात आणि अभिनयात आवाज व देहबोलीचे महत्त्व अनमोल आहे. याच विषयावर मूळ सावंतवाडीचे आणि सध्या मुंबईत स्थायिक असलेले प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक-रंगकर्मी व आवाजतज्ज्ञ श्रीनिवास नार्वेकर यांचे ८ ते १५ वयोगटातील मुलांसाठी एक विशेष, विनामूल्य व्याख्यान आयोजित केले आहे. बालरंग संस्था आणि मुक्ताई अकॅडमी यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.
हे व्याख्यान रविवारी (ता.२७) सकाळी ९.३० ते दुपारी १.३० या वेळेत सावंतवाडी येथील खासकीलवाडा येथील पाटणकर वाड्यातील मुक्ताई अकॅडमीच्या जागेत होईल. आजच्या स्पर्धात्मक युगात मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे, सार्वजनिक ठिकाणी योग्य पद्धतीने बोलणे-चालणे शिकवणे आणि स्वतःच्या क्षेत्रात ठामपणे उभे राहण्यासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करणे महत्त्वाचे आहे. अनेकदा या गोष्टींकडे दुर्लक्ष केले जाते, ज्यामुळे भविष्यात संधी हुकतात. अभिनयाच्या माध्यमातून आवाज आणि देहबोलीचे महत्त्व मुलांना समजावून सांगण्यासाठी हे व्याख्यान आहे. श्री. नार्वेकर आणि मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष कौस्तुभ पेडणेकर यांनी लहान मुलांसाठी नाटक, अभिनय आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांना या विनामूल्य संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. नावनोंदणी आणि अधिक माहितीसाठी श्री. पेडणेकर यांच्याशी संपर्क साधावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cough Syrup Ban : कफ सिरप प्यायल्याने मध्यप्रदेश अन् राजस्थानमध्ये ११ बालकांचा मृत्यू; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

Dr. Baba Adhav : शब्दांचे खेळ न करता सरकारने संकटग्रस्तांबरोबर उभे राहावे

Bacchu Kadu : निष्ठा मायबापावर ठेवा, नेता व त्यांच्या पक्षावर नाही!

Ajit Pawar : शेतकऱ्यांनी खचून जाऊ नका, सरकार तुमच्या पाठीशी आहे

Latest Marathi News Live Update: मुंबईत तीन दिवस पाणी कपातीचे संकट

SCROLL FOR NEXT