कोकण

विद्यार्थ्यांना करिअरचे धडे

CD

N79767

दोडामार्ग महाविद्यालयात
विद्यार्थ्यांना करिअरचे धडे
सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. २४ : नवीन शैक्षणिक धोरणामुळे संशोधन क्षेत्रात विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत, असे प्रतिपादन प्रमुख व्याख्याते प्रा. डॉ.‌ पी. डी. गाथाडे यांनी येथे केले. लक्ष्मीबाई सीताराम हळबे महाविद्यालयात संशोधन आणि अविष्कार विभागाच्या वतीने ‘संशोधनाची ओळख व मार्गदर्शन’ या विषयावर आयोजित एक दिवशीय कार्यशाळेत ते बोलत होते. या संधींचा उपयोग विद्यार्थ्यांनी करिअरसाठी करावा, असे आवाहन त्यांनी केले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सोपान जाधव होते. संशोधनाचा मुख्य उद्देश नवीन ज्ञान मिळविणे, समस्या सोडविणे आणि समाजाच्या प्रगतीसाठी विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त योगदान देणे हा आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाच्या संशोधन आणि अविष्कार विभागामध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी आय‌.क्यू.ए.सी. चे समन्वयक प्रा. डी. वाय‌. बर्वे उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. डॉ‌. आर. एस. इंगळे यांनी, सूत्रसंचालन सानिया गौडळकर यांनी केले. साक्षी राऊळ हिने आभार मानले.
....................
79768

आमदार नीलेश राणेंकडून
सावंत कु़टुंबियांचे सांत्वन
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २४ः काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जिल्हा बँकेचे माजी संचालक शिक्षण महर्षी विकास सावंत यांचे निधन झाले. या पार्श्वभूमीवर कुडाळ मालवणचे आमदार नीलेश राणे यांनी त्यांचे सुपुत्र विक्रांत सावंत यांच्यासह कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले. विकास सावंत यांचे राजकीय, सामाजिक, सहकार व शैक्षणिक क्षेत्रातील कार्य फारच मोठे होते. त्यांच्या रुपाने एक जवळचा मार्गदर्शक हरपला, अशा शब्दांत आमदार राणे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, शिवसेना पदाधिकारी विनोद सावंत, युवा सेनेचे पदाधिकारी ओमकार सावंत, निखिल सावंत, संकल्प धारगळकर, राजू राणे व रामदास निलख यांच्यासह सावंत कुटुंबीय उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दारू ड्रग्ज हुक्का...! पुण्यातल्या रेव्ह पार्टीत बड्या राजकीय नेत्याचा पती सापडला! २ महिलांसह ५ पुरुषांना घेतलं ताब्यात

American Airlines Flight : उड्डाण करतानाच विमानाच्या लॅंडिंग गियरमध्ये आग, १७३ प्रवाशांसह ६ क्रू मेंबर्सचा जीव टांगणीला अन्...

Satej Patil : माणसं येतात जातात परंतु माणसं तयार करणारी फॅक्टरी बंटी पाटील हाय..., आमचं ठरलयं नाही आता त्यांचा करेक्ट कार्यक्रमचं

Latest Maharashtra News Updates: हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरीत ६ जणांचा मृत्यू

Pune Traffic : गणेशोत्सवाच्या तयारीसोबत खरेदीची गर्दी; पुण्याच्या मध्यवर्ती भागांत वाहतूक कोंडी

SCROLL FOR NEXT