कोकण

कोळोशी-हडपिडमध्ये विद्यार्थ्यांना वह्या

CD

79864


कोळोशी-हडपिडमध्ये विद्यार्थ्यांना वह्या वाटप

नांदगाव, ता. २५ ः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळा कोळोशी वरचीवाडी, जिल्हा परिषद शाळा कोळोशी हडपिड व माध्यमिक शिक्षण शाळा कोळोशी-हडपिडच्या विद्यार्थ्यांना कणकवली माजी सभापती मनोज रावराणे यांच्या वतीने वह्या वाटप केल्या.
यावेळी कणकवली तालुका भाजप सरचिटणीस पंढरी वायंगणकर, कोळोशी सरपंच गुरुनाथ आचरेकर, शाळा समिती अध्यक्ष कीशोर राणे, मुख्याध्यापिका सौ.अश्विनी गर्जे, मुख्याध्यापिका सौ. तेली, मुख्याध्यापिका सौ. तांबे, माजी सरपंच सुशील इंदप, श्रीमती सुचिता पोकळे, उत्तम सावंत, मंगेश इंदप, सदानंद पावसकर, शामराव परब, सौ. मुंडे आदी उपस्थित होते.
श्री. वायंगणकर यांनी आपल्या शाळेत विद्यार्थ्यांना ज्या काही समस्या असतील, त्या पालकमंत्री नीतेश राणे यांच्या माध्यमातून नक्की सोडविण्याचा प्रयत्न राहील, असे सांगितले. यावेळी कोळोशी-हडपिड हायस्कूलमध्ये सध्या ५३ विद्यार्थी असून, सायंकाळी आयनलला जाणारी एसटी अनेकवेळा सायंकाळी ७ वाजले तरी येत नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होतात, असे चेअरमन किशोर राणे व मुख्याध्यापिका गर्जे यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर श्री. वायंगणकर यांनी याबाबत पालकमंत्री राणे यांच्याशी बोलून ही गैरसोय नक्की दूर करण्याचे आश्वासन दिले. यावेळी सरपंच गुरुनाथ आचरेकर, चेअरमन किशोर राणे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार सौ. अश्विनी गर्जे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दारू ड्रग्ज हुक्का...! पुण्यातल्या रेव्ह पार्टीत बड्या राजकीय नेत्याचा पती सापडला! २ महिलांसह ५ पुरुषांना घेतलं ताब्यात

Eknath Shinde : धैर्यशिल मानेंना खासदार करण्यासाठी एकनाथ शिंदेंनी जादू केली, पुत्र श्रीकांत शिंदेंचे वक्तव्य

कपाळावर मोठं कुंकू, केसात गजरा आणि नववार साडी, झी मराठी वाहिनीवर दिसणार निर्मिती सावंत, नक्की कोणती भूमिका साकारणार

American Airlines Flight : उड्डाण करतानाच विमानाच्या लॅंडिंग गियरमध्ये आग, १७३ प्रवाशांसह ६ क्रू मेंबर्सचा जीव टांगणीला अन्...

Satej Patil : माणसं येतात जातात परंतु माणसं तयार करणारी फॅक्टरी बंटी पाटील हाय..., आमचं ठरलयं नाही आता त्यांचा करेक्ट कार्यक्रमचं

SCROLL FOR NEXT