कोकण

राजापूर-निसर्गसौंदर्य, ऐतिहासिक वास्तू पर्यटकांना खुणावताय

CD

79886
79889
79890
79899
rat25p27.jpg

निसर्गसौंदर्य, ऐतिहासिक वास्तू
पर्यटकांना खुणावतात
राजापूर तालुक्यात पर्यटनासाठी हव्यात मुलभूत सुविधा; राजापुरात रस्त्यांची दुरवस्था, गाईड, गाड्यांची कमतरता
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २५ ः देखण्या निसर्गसौंदर्याची कोकणाला दैवी देणगी लाभली असून, त्याचा वारसा राजापूर तालुक्यालाही लाभला आहे. सह्याद्री ते समुद्रकिनारा अशा विस्तारलेल्या राजापूरमध्ये पर्यटकांच्या नजरा खिळवून ठेवणारे निसर्गसौंदर्य, वैशिष्ट्यपूर्ण परिसर, प्रसिद्ध मंदिरे, धार्मिक ठिकाणे, तीर्थक्षेत्र आणि कातळखोद चित्र, गडकिल्ले, स्वच्छ आणि सुंदर निळाशार सागरी किनारपट्टी, नानाविविध पशुपक्षी, प्राचीन धार्मिक स्थळे, सूर्यमंदिर, चारही बाजूंनी पाण्याने वेढलेले जुवे बेट, अशी कोकण आणि पश्‍चिम घाटातील वैशिष्ट्यपूर्ण जैवविविधतता या ठिकाणी पाहायला मिळते. त्याच्या जोडीला पावसाळी हंगामामध्ये कातळ अन् सडा परिसरामध्ये फुलणारा विविधांगी फुलोरा साऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. अलौकिक निसर्गसौंदर्य आणि जैवविविधततेची अनुभूती देणारे राजापूरच्या पर्यटनाला चालना मिळण्यासाठी सकारात्मक प्रयत्नांची आवश्यकता आहे.
-------------

कशेळीच्या देवघळी बीचला अधिक पसंती

रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, दापोली, गुहागर येथील समुद्रकिनाऱ्यांसह लगतचे सिंधुदुर्ग जिल्हा आणि गोवा राज्यातील समुद्रकिनाऱ्यावर लोकांची गर्दी असते. त्यामुळे पर्यटकांना अपेक्षित असलेली निसर्गाच्या सान्निध्यातील शांतता फारशी अनुभवता येत नाही. पाच-सहा वर्षांमध्ये शांत आणि देखणे समुद्रकिनारे असलेल्या कशेळी येथील देवघळी बीच, वेत्ये, आंबोळगड समुद्रकिनाऱ्याकडे पर्यटकांची पावले वळू लागली आहेत. येथील पर्यटनस्थळांनी चित्रपटसृष्टीलाही भुरळ घातली आहे. गेल्या काही वर्षामध्ये कशेळी येथील सेल्फी पॉईंट, निळाशार समुद्रकिनारा आणि देवघळी बीच या ठिकाणी प्री-वेडिंग शूटसाठी प्रसिद्ध होऊ लागले आहे.
----------

rat25p24.jpg-
79887
राजापूर ः पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी अणसुरे बांध ते विजयदुर्ग किल्ला, अशी फेरीबोट सुरू करण्याची गरज आहे.

फेरीबोटीतून रोजगार निर्मिती शक्य

पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी राजापुरातील अणसुरे बांध ते विजयदुर्ग किल्ला अशी फेरीबोट सुरू करण्याची गरज आहे. यामुळे समुद्र पर्यटनाचा आनंद राजापुरात आलेल्या पर्यंटकांना घेता येईल. यातून स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल.
......

पर्यटनातून रोजगारनिर्मिती

पर्यटनातून हॉटेल, लॉजिंग, वाहतूक व्यवसाय, दळणवळण व्यवसाय यांना चालना मिळणार आहे. येणाऱ्या पर्यटकांना माहिती देणारा गाईड म्हणून रोजगार उपलब्ध होणार आहे. त्याचवेळी, विविध करांच्या माध्यमातून ग्रामपंचायत वा स्थानिक स्वराज्य संस्थेला उत्पन्न मिळणार आहे. कोकणामध्ये उपलब्ध असलेल्या नानाविध कच्च्या सामुग्रीतून नवनवीन उत्पादने उत्पादित केली जात आहे. त्याच्या खरेदी-विक्रीतून लाखो रुपयांची उलाढाल होऊन स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. पर्यटकांच्या माध्यामातून कोकणातील मेवा साता समुद्रापार पोहोचणार आहे.
---------
पर्यटनस्थळाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था

राजापूरच्या पर्यटनाला चालना देणे आणि वृद्धी होण्यासाठी पर्यटनस्थळांच्या परिसरामध्ये पर्यटकांना आवश्यक असलेल्या विविधांगी पायाभूत सुविधांची उभारणी होणे गरजेचे आहे. अनेक पर्यटनस्थळांना जोडणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. धार्मिक आणि पर्यटनस्थळांकडे जा-ये करण्यासाठी वाहनाची वा गाड्यांची पुरेशा प्रमाणात सुविधा आणि व्यवस्था नाहीत. या गावांना जोडणाऱ्या एसटी गाड्या आहेत; मात्र त्यांच्या दिवसभरातील फेऱ्या मर्यादित असल्याने त्यांचा फारसा उपयोग होत नाही. राहण्यासाठी दर्जेदार लॉजिंग, हॉटेल्स यांच्यासह पर्यटनस्थळांची माहिती देणाऱ्या ‘गाईड’ची आवश्यकता आहे.
----------
चौकट
प्रसिद्ध मंदिरे

श्री धूतपापेश्‍वर-धोपेश्‍वर
श्री आर्यादुर्गा-देवीहसोळ
श्री महाकाली-आडिवरे
कनकादित्य सूर्यमंदिर-कशेळी
श्री भार्गवराम मंदिर-देवाचेगोठणे
श्री महालक्ष्मी-उन्हाळे
श्री कात्रादेवी-सागवे
श्री दत्तमंदिर-केळवली
श्री देव अंजनेश्‍वर-मिठगवाणे
श्री संगनाथेश्‍वर-रायपाटण
श्री मल्लिकार्जुन-प्रिंदावण
-----------
-rat25p25.jpg-
79888
काजिर्डा धबधबा

चौकट

धबधबे
सवतकडा-परीटकडा- चुनाकोळवण
काजिर्डा
धोपेश्‍वर
सौंदळ
ओझर
गोठणेदोनिवडे-हातणकरवाडी
कातळकडा-हर्डी
देवाचेगोठणे-सोगमवाडी
----------
चौकट
किल्ले
राजापूर शहरातील ब्रिटिशकालीन वखार
नाटेतील किल्ले यशवंगड
किल्ले आंबोळगड-आंबोळगड
----------
चौकट
अश्मयुगीन कातळशिल्प अन् वैशिष्ट्यपूर्ण सडा
अणसुरेचे एकाश्मस्तंभ
येरडव येथील पांडवकालीन मंदिर अन् इतिहासकालीन पायवाट
अणुस्कुरा मार्गावरील दोनशे वर्षांपूर्वीचा शिलालेख
चारही बाजूंनी पाण्याचे वेढलेले जुवे बेट
पुरातन लेणी
----------
चौकट
राजापुरातील प्रसिद्ध बीच
दांडे अणसुरे बीच
कशेळी बीच
आंबोळगड बीच
वेत्ये बीच
----------
कोट
विविधांगी निसर्गसंपदेचा वारसा लाभलेल्या राजापूर तालुक्यातील सागरी महामार्गावरील अणसुरे बांध समुद्रकिनाऱ्याच्या पैलतिरावरचा विजयदुर्ग किल्ल्याचा जागतिक वारसास्थळांच्या यादीमध्ये समावेश झाला आहे. तालुक्याच्या पर्यटन विकासाला चालना मिळण्यास संधी निर्माण झाली आहे. या साऱ्यातून राजापूर तालुक्याचा पर्यटन विकास हा धावपट्टीवर आहे. आता उड्डाण करण्याची वेळ आली आहे. माय राजापूर संस्था पर्यटनवाढीसाठी प्रयत्नशील असून, त्यासोबत प्रबळ इच्छाशक्तीची आवश्यकता आहे.
- प्रदीप कोळेकर, माय राजापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates: प्रांजल खेवलकरच पार्टीचे आयोजक - महाजन

Women's Chess World Cup : दिव्या-हंपी पहिला डाव बरोबरीत, महिला विश्वकरंडक बुद्धिबळ; दोघींनीही वर्चस्वाची संधी गमावली

दारू ड्रग्ज हुक्का...! पुण्यातल्या रेव्ह पार्टीत बड्या राजकीय नेत्याचा पती सापडला! २ महिलांसह ५ पुरुषांना घेतलं ताब्यात

Eknath Shinde : धैर्यशिल मानेंना खासदार करण्यासाठी एकनाथ शिंदेंनी जादू केली, पुत्र श्रीकांत शिंदेंचे वक्तव्य

कपाळावर मोठं कुंकू, केसात गजरा आणि नववार साडी, झी मराठी वाहिनीवर दिसणार निर्मिती सावंत, नक्की कोणती भूमिका साकारणार

SCROLL FOR NEXT