swt257.jpg
79903
वेंगुर्लेः राऊळवाडा येथे वेंगुर्ला शाळा क्रमांक ४ च्या विद्यार्थ्यांनी भात लावणीचा आनंद लुटला.
वेंगुर्ला शाळा क्रमांक ४ च्या
विद्यार्थ्यांनी अनुभवली ‘शेती’
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. २५ः ‘बांधावरील शाळा’ या उपक्रमांतर्गत येथील शाळा क्रमांक ४ च्या पहिली ते सातवीच्या ८० विद्यार्थ्यांनी राऊळवाडा येथे पारंपरिक पद्धतीने शेतीतील प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी भाताची लावणी, तरवा काढणे, चिखल करणे ही कामे कशी करावी, हे जाणून घेतले. शेतीतील अवजारे, यंत्रसामग्री आणि ट्रॅक्टर याविषयी प्रत्यक्ष शेतकऱ्यांकडून माहिती मिळाली.
या कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापक श्रीमती बेहरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अजित राऊळ, उपाध्यक्ष हर्षद परब, माजी अध्यक्ष व शिक्षणप्रेमी वासुदेव उर्फ बाळा परब, मेघना राऊळ, पदवीधर शिक्षक संतोष परब, उपशिक्षक सुधर्म गिरप सानिका कदम, युवा प्रशिक्षणार्थी नेहा परब, अंगणवाडी सेविका नयना आरेकर, मदतनीस सत्यभामा गावडे, तसेच पालक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, माता-पालक संघ व शिक्षक- पालक संघ सदस्य उपस्थित होते. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शेतीविषयक ज्ञान, अनुभव व ग्रामीण जीवनाची जाण मिळाली.
-------------
swt258.jpg
79904
कुडाळः आमदार निलेश राणे यांचा खरेदी विक्री संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
कुडाळ ‘खरेदी विक्री’ला
पूर्ण सहकार्याची ग्वाही
कुडाळ, ता. २५ः येथील खरेदी विक्री संघाला आमदार निलेश राणे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी खरेदी-विक्री संघाच्या पाठीशी मी सदैव उभा आहे. तुम्हाला कोणत्याही प्रकारची मदत लागली तर मला निश्चित सांगा, असे आश्वासन दिले.
या भेटीदरम्यान श्री. राणे यांनी सहकार महर्षी शिवराम भाऊ जाधव यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, शिवसेना उपनेते संजय आंग्रे, सरचिटणीस दादा साईल, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष दीपक नारकर, संचालक संजय पडते, निलेश तेंडोलकर, विनायक अणावकर तसेच उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, तालुकाप्रमुख विनायक राणे, मालवण शहर प्रमुख दीपक पाटकर, व्यवस्थापक करावडे आदी उपस्थित होते.
खरेदी विक्री संघाच्या संचालकांनी खत पुरवठा भात बियाणे पुरवठा संदर्भात आमदार राणे यांच्याशी चर्चा केली. राणे यांनी खरेदी-विक्री संघाच्या पाठीशी मी सदैव उभा राहीन तुम्हाला कोणत्याही प्रकारची मदत लागली तर मला निश्चित सांगा, असे सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.