कोकण

कोकणचे भाग्यविधाते रामदासभाई

CD

१८ (रामदास कदम वाढदिवस पुरवणी लेख ३)
(टिप ः रामदास कदम वाढदिवस पुरवणी)


rat२६p२५.jpg
२५N८०१०१,
शिवसेना सचिव आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्या कार्यालयात शिवसेना नेते रामदास कदम व सौ. ज्योती रामदास कदम यांनी भेट दिली.

rat२६p२६.jpg -
२५N८०१०२
वेगेवगळ्या राजकीय मुद्द्यावर कार्यकर्त्यांशी संवाद साधताना शिवसेना नेते रामदास कदम, सौ. ज्योती रामदास कदम, गृहराज्यमंत्री योगेश कदम.
---
आपल्या कर्तृत्वाने संपूर्ण राजकारणाचा वारू वेगाने दवडत नेणाऱ्या रामदासभाईंनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा स्वच्छंदीपणे उमटवला आहे. भाई म्हणजे स्वकर्तृत्वावर फुललेलं नेतृत्व असून, हे नेतृत्व महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर जाऊन पोहोचलेलं आहे. स्व. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेले राजकारण करून त्यांच्या तत्त्वाप्रमाणे सामाजिक आणि राजकीय प्रगतीची वाट शून्यातून शोधणाऱ्या भाईंचा विकासात्मक कामात कोणीच हात धरू शकत नाही.

rat२६p७.jpg -
२५N८००६०
- शैलेश कदम, उद्योजक, जामगे
----
कोकणचे भाग्यविधाते...
रामदासभाईंसारखा गतिमान आणि कार्यकुशल नेतृत्व तालुक्यालाच नव्हे तर राज्याला लाभलेला कोहिनूर हिरा आहे. खऱ्याने वागणाऱ्यांना नेहमी यश मिळते, हा नीतीनीचा नियमच आहे. युवापिढीला केवळ राजकारणाचा सल्ला न देता राजकारणातून समाजहित साधणे, युवकांनी संघटितरीत्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी सज्ज व्हावे, असे अनमोल विचार त्यांच्या कृतीतून कार्यकर्त्यांना मिळले. राज्याचे नेते असलेले भाई तालुक्याचेच नव्हे तर कोकणचे भाग्यविधाते आहेत. लढाऊपणा, स्पष्ट वक्तेपणा आणि कार्यकर्ता जपण्याचा स्वभाव अशा विविध गुणसंपन्न पैलूंनी त्यांचे नेतृत्व साकारलेले आहे. सवंग लोकप्रतिनिधीसाठी कधीही तडजोड न करणाऱ्या भाईंनी आजवर राजकीय उलाढालीमध्ये जी जी भूमिका घेतली ती अनाकलनीय आहे. ते जसे स्पष्ट वक्ते आहेत तसेच ते दिलदारही आहेत. कोणालाही खोटी आश्वासने देऊन आपली गुलामगिरी पत्करायला लावणे, हे त्यांच्या स्वभावातच नाही. त्यांचे सुपुत्र व राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली सद्यःस्थितीत महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी आपल्या कार्यकुशलतेने उत्तम कामकाज सुरू आहे. विकासात्मक दृष्टिकोन ठेवून योगेशदादांनी संपूर्ण महाराष्ट्रात आपली घोडदौड सुरू ठेवली आहे. त्यांच्या कुशल संघटन कौशल्यामुळे ते तरुणांच्या गळ्यातील ताईत बनलेले आहेत. योगेशदादांच्या खांद्याला खांदा लावून संघटना बळकटीसाठी अहोरात्र राबणाऱ्या सर्वच कार्यकर्त्यांना भाईंच्यामुळे केवळ आत्मविश्वासच नाही तर राजकीय क्षेत्रातील उत्तुंग यशाची शिखरे चढण्याचं बळ मिळत आहे. भाईंनी अगदी एखाद्या सैनिकाप्रमाणेच जीवनातील समाजकारण, राजकारण, सहकार, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील कुस्ती जिंकावी, अशा पद्धतीने आपली कारकीर्द सिद्ध केली. समाजकारणाच्या माध्यमातून जनतेचे हृदय सिंहासन काबीज करून जनसामान्यांमध्ये मानाचे स्थान मिळवणाऱ्या भाईंचा कार्यरूपी अश्वमेध असाच उधळत राहो, त्यांना दीर्घायुष्य लाभो हीच वाढदिनी सदिच्छा...
--
चौकट
चालण्या, बोलण्यात, वागण्यात पुरेपूर सच्चाई
भाईंच्या स्वभावात दूरदृष्टीच आहे. त्यांच्या चालण्या, बोलण्यात, वागण्यात आणि कृतीत पुरेपूर सच्चाई आहे. म्हणूनच जनतेचा त्यांच्यावर दृढ विश्वास आहे. अमोघ वक्तृत्व, माणसं जोडण्याची अफाट क्षमता, कार्यकर्त्यांची अचूक निवड करण्याची गुणग्राहकता आधीच्या जोरावर त्यांना राज्याचे नेतृत्व करण्याची अनेकवेळा संधी मिळाली. सर्वसामान्यांच्या उन्नतीसाठी झटणारा नेता, अशी ओळख अवघ्या कोकणासह महाराष्ट्राला झाली आहे. स्पष्ट आणि परखड बोलणं यामुळे त्यांच्या गुणांची उंची अधिकच वाढलेली दिसून येते. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची त्यांची राजकीय हातोटी आणि शैली यामुळे त्यांची राजकीय कामगिरी निश्चितच उजवी आणि स्वच्छ आहे.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे पहिल्यांदाच मातोश्रीवर, महाराष्ट्राच्या राजकारणाचा नवा अध्याय सुरु?

महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या अर्जुन सुभेदार खऱ्या आयुष्यातील बायकोचा सतत खातो ओरडा, म्हणाते..'किती वाकडं तोंड...'

Video : फूडचं पाऊल ! मराठी अभिनेत्रीची हॉटेल क्षेत्रात एंट्री ; सुबोध भावेच्या हस्ते पार पडलं उद्घाटन

Baramati Accident : बारामतीत भीषण अपघात, हायवाच्या धडकेत वडिलांसह दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू

Jalna Crime : मंठा तालुक्यात अनैतिक संबंधाच्या संशयातून अमानुष खून

SCROLL FOR NEXT