80116
कुडाळ ‘विनायक व्हिल्स’ला
राष्ट्रीय स्तरावरील उपविजेतेपद
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २६ ः पवई (मुंबई) येथे झालेल्या सुझुकी मोटारसायकल इंडियाच्या डिलर कॉन्फरन्समध्ये (२०२४-२५) येथील श्री विनायक व्हिल्स प्रा. लि. ने जगातील टॉप ब्रँड सुझुकी मोटारसायकल इंडियाच्या देशभरातील डिलरमधून राष्ट्रीय स्तरावर हाईएस्ट व्हिएकल अॅसेसरिज सेल पर व्हिएकल (Highest Vehicle Accessories Sale Per Vehicle) मध्ये उपविजेतेपद पटकावले.
ही डीलर कॉन्फरन्स नुकतीच पवईस्थित दी वेस्टिन हॉटेल, मुंबई येथे झाली. त्यामध्ये श्री विनायक व्हिल्स प्रा.लि. सुझुकी, कुडाळ या डीलरने आपले वर्चस्व सिद्ध केले. याचे मॅनेजिंग डायरेक्टर राजेंद्र तेरसे यांना सुझुकी इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर केनिची उमेडा सान यांनी पुरस्कार देऊन सन्मानित केले. या कार्यक्रमास सुझुकी इंडियाचे व्हॉईस प्रेसिडेंट दीपक मुथरेजा सांन, देवाशीष हंडा सान, व्यवस्थापकीय संचालक मित्सुमोटो वटाबे हरीकृष्ना सान उपस्थित होते. श्री. तेरसे यांनी ग्राहकांचे समाधान हेच श्री विनायक व्हिल्स प्रा.लि. व सुझुकी मोटारसायकल इंडिया प्रा.लि. यांचे ध्येय आहे. तसेच सुझुकी मोटार सायकल इंडिया प्रा. लि. मी., सुझुकी मोटार सायकल जपान प्रा. लिमिटेड यांच्या तीने हा पुरस्कार देऊन सन्मानित केले. या सर्व यशात सुझुकीचे पॅरामीटर्स, प्रशिक्षित कर्मचारी, प्रशिक्षण, त्यांनी मिळविलेले सर्टिफिकेट्स, होलसेल ॲक्सेसरिज, सेल्स व सर्विस पॅरामीटर्समध्ये सातत्य ठेवल्यामुळे हे यश मिळवणे शक्य झाले, असे सांगितले.