कोकण

प्लास्टिक फुलांवरील बंदीचा फूल शेतकऱ्यांना दिलासा

CD

प्लास्टिक फुलांवरील बंदीचा फूल शेतकऱ्यांना दिलासा
ताज्या फुलांची मागणी वाढेल; प्रभावी अंमलबजावणीची गरज
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २८ ः राज्यात कृत्रिम व प्लास्टिक फुलांवर बंदी घालण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यातील फूल उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे येणाऱ्या गणेशोत्सवात बाप्पांची पूजा नैसर्गिक, सुगंधित फुलांनी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
भारतीय संस्कृतीत फुलांचे धार्मिक आणि सामाजिक महत्त्व अनन्यसाधारण आहे. पूजा, उत्सव, विवाह किंवा कोणताही शुभ प्रसंग फुलांशिवाय अपूर्णच मानला जातो. मात्र मागील काही वर्षांत प्लास्टिकच्या फुलांनी बाजारपेठ काबीज केल्याने नैसर्गिक फुलांची मागणी मोठ्याप्रमाणात घटली होती. प्लास्टिक माळा स्वस्त आणि टिकाऊ असल्यामुळे ग्राहक त्या अधिक प्रमाणात खरेदी करत होते. परिणामी जिल्ह्यात झेंडू, गुलाब, लिली यासारखी फुले पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत होते. शासनाने कृत्रिम व प्लास्टिक फुलांवर घातलेल्या बंदीमुळे नैसर्गिक फुलांना पुन्हा मागणी वाढणार आहे. दरही काही प्रमाणात स्थिर राहण्याची शक्यता आहे. कारण गणेशोत्सवात फुलांची विक्री सर्वाधिक होते. मात्र, उत्पादन व पुरवठा नियमित ठेवणे आवश्यक आहे. घोषणा झाली असली तरीही अंमलबजावणी प्रभावीपणे होणे आवश्यक आहे. बाजारात अद्यापही काही विक्रेते प्लास्टिक माळा विक्री करत आहेत. त्यांच्यावर तातडीने कारवाई झाली, तरच या निर्णयाचा खरा फायदा शेतकऱ्यांना होईल.

चौकट
फुलांसाठी परजिल्ह्यावर अवलंबून
रत्नागिरी जिल्ह्यात काही प्रमाणात फुलांची शेती होते. मात्र बहुतांश फुले पुणे, कोल्हापूर, नवी मुंबई येथून येतात. स्थानिक पातळीवर फुलांची उत्पादकता वाढवण्यासाठी सरकारने पुढाकार घेणे आवश्यक आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कृत्रिम फुलांवर बंदी ही स्वागतार्ह बाब आहे. मात्र, या निर्णयाची योग्य अंमलबजावणी आणि नैसर्गिक फुलांची मुबलक उपलब्धता हे दोन घटक यशाचे मुख्य आधार ठरणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Owaisi on Ind vs Pak Cricket match: भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅचवरून आता ओवैसीचा संसदेत मोदींना सवाल, म्हणाले..

Nandani Elephant : हत्तीने भावना जिंकल्या! महादेवीला नांदणीतून निरोप, भट्टारकांच्या डोळ्यांत अश्रू; हत्तीणही रडली, संपूर्ण गावात हळहळ

मोठी बातमी! स्मार्ट मीटरमधून भविष्यात जेवढा रिचार्ज तेवढीच वीज; बिल थकल्यास सुरक्षा ठेवीतून वसुली, दररोज वीजेचा वापर किती? मोबाईलवर समजणार, वाचा...

Dharavi Firing: धक्कादायक! धारावीत गोळीबाराची घटना, महिला घरासमोर उभी होती अन् तेवढ्यात...

Pune News : कारगिल युद्धातील सैनिकाच्या कुटुंबीयांवर झुंडशाही; मध्यरात्री सिद्ध करावे लागले नागरिकत्व

SCROLL FOR NEXT