कोकण

आंबा बागयतदारांना मिळणार १५ लाख

CD

आंबा बागायतदारांना मिळणार १५ लाख
अवकाळीत नुकसान ; ४०.०१ हेक्टरला फटका
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २८ ः राज्यातील अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या नुकसानापोटी शासनाने ३३७ कोटी ४१ लाख ५३ हजार इतक्या निधीला मान्यता दिली आहे. जिल्ह्यात एप्रिल, मे महिन्यात पडलेल्या मॉन्सूनपूर्व पावसामुळे १८३ आंबा बागायतदारांच्या एकूण ४०.०१ हेक्टर पिकांचे नुकसान झालेले आहे. या नुकसानापोटी शासनाकडून १५ लाखांचा निधी मंजूर केला आहे.
फेब्रुवारी ते मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे कोकणातील ४७३.६९ हेक्टर क्षेत्र बाधित होऊन १३.६०७ शेतकऱ्यांसाठी ९ कोटी ३८ लाख २४ हजार रुपयांची नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर भरपाईची ही रक्कम जमा केली जाणार आहे.

चौकट....
राजापुरात १३.३५ हेक्टर क्षेत्र बाधित
कृषी विभागातर्फे एप्रिल व मे मधील नुकसानग्रस्त भागाचा अहवाल शासनाकडे पाठवण्यात आला होता. एप्रिलमध्ये राजापूर तालुक्यातील ३० आंबा बागायतदारांचे १३.३५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले. या नुकसानापोटी ३ लाख ४ हजार इतक्या भरपाईची मागणी करण्यात आली होती. मे महिन्यात जिल्ह्यातील १५३ आंबा बागायतदारांचे २६.६६ हेक्टर क्षेत्र बाधित होऊन ७ लाख रुपयांचे नुकसान झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai Crime: 17 वर्षीय मुलीचा लग्नास नकार, व्यक्ती संतापला, रागात घरात घुसला अन्...; नको ते घडलं!

Woman Suspicious Death : शेतात वृद्धेचा संशयास्पद मृत्यू, चंदगडमधील घटना; फॉरेन्सिक लॅबची घेणार मदत

ZP, पंचायत समिती निवडणूक सोपी राहिली नाही, ३ कोटी अन् १०० बोकड; कार्यकर्ते उद्ध्वस्त होतात, शिंदेचे आमदार काय म्हणाले?

Eknath Shinde उपमुख्यमंत्री शिंदेंचा सोशल मीडिया हॅक, Xच्या खात्यावर हॅकर्सनी व्हिडीओ पोस्ट केल्यानं खळबळ

BCCI President : बीसीसीआयचा अध्यक्ष ठरला? माजी क्रिकेटपटूचं नाव चर्चेत...असा खेळाडू जो आपल्याला आठवतंही नसेल; पडद्यामागे नेमकं काय घडतंय?

SCROLL FOR NEXT