कोकण

परुळेतील शेतीत विद्यार्थ्यांचा ‘बळीराजासाठी एक दिवस’

CD

80795

परुळेतील शेतीत विद्यार्थ्यांचा
‘बळीराजासाठी एक दिवस’

जिल्हा परिषद शाळेचा उपक्रम

म्हापण, ता. २९ ः जिल्हा परिषद परुळे शाळा क्र. ३ च्या शिक्षकांनी मुलांसोबत ‘बळीराजासाठी एक दिवस’ या उपक्रमांतर्गत शाळेजवळ असलेल्या शेतात जाऊन शेती कामांचा आनंद लुटला. ‘बांधावरची शाळा’ उपक्रम मोठ्या उत्साहात राबविला.
यावेळी शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी नांगरणी, तरवा काढणी, भात लावणी आदी कामांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. जिल्हा परिषदच्या वतीने ‘बळीराजासाठी एक दिवस’ हा उपक्रम दरवर्षी जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये राबविण्यात येतो. विद्यार्थ्यांना बालवयापासून शेतकऱ्याबद्दल आदर व प्रेम निर्माण व्हावे, शेती विषयी माहिती मिळावी, यासाठी परुळे शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष बांधावर जात शेतीचे धडे घेतले. यावेळी ‘धरतीची आम्ही लेकरं’ या गाण्यावर मुलांनी ठेका धरला. शेतीच्या चिखलात उतरत मातीशी नाळ जोडली गेली. यावेळी मुख्याध्यापक प्रविणा दाभोलकर, शिक्षक दत्तात्रय म्हैसकर, रवींद्र गोसावी, शालीक पाटील आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: शेतकऱ्यांना मोठा दिलासा! दुष्काळात मिळणाऱ्या सर्व सवलती लागू करणार, देवेंद्र फडणवीस यांची मोठी माहिती

Thane News: बाजारपेठेत अतिक्रमण, वरून मराठी भाषेबद्दल गरळ ओकली; मनसैनिकांनी परप्रांतीयाला बेदम चोपलं

Nashik AB Gang चा 'भाई' जेलमधून बाहेर, समर्थकांनी काढली मिरवणूक, पोलिसांनी मग पुरती झिरवली | Video Viral | Sakal News

Satara News: 'सज्‍जनगडावरील मंदिराचे पालटतेय रुपडे': सभागृहाची रंगरंगोटी; महाद्वारानजीक नवीन रेलिंग बसविण्‍याच्‍या कामालाही गती

Latest Marathi News Live Update: शेतकऱ्यांना मदत करताना सत्ताधारी, विरोधक यामध्ये राजकारण करण्याची गरज नाही- एकनाथ शिंदे

SCROLL FOR NEXT