80775
भाजपने जे पेरले तेच आता
उगवतंय ः वैभव नाईक
भाजपने पैशांच्या आमिषांवर पक्ष वाढविला
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. २९ ः सिंधुदुर्गात भाजपने पैशांच्या आमिषांद्वारे कार्यकर्ते मिळवून पक्ष वाढविला. मात्र, आता या कार्यकर्त्यांना अधिक आमिषे मिळताच ते दुसऱ्या पक्षात स्थलांतरित होत आहेत. यामुळे भाजपने जिल्ह्यात जे पेरले, तेच उगवले अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी टीका माजी आमदार वैभव नाईक यांनी आज केली.
श्री. नाईक म्हणाले, ‘‘भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी शिंदे गटाकडे कार्यकर्त्यांना आमिषे देऊन पक्षप्रवेश घडवून आणला जात असल्याची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मात्र, अप्पासाहेब गोगटे, सदा ओगले, अभय सावंत, अतुल काळसेकर, हडकर यांसारखे जुन्या विचारांचे कार्यकर्ते यापूर्वी पक्षासाठी समर्पित होते. त्यांनी अनेक कार्यकर्ते घडविले. मात्र, ग्रामपंचायत, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने पैशांचा वापर करून कार्यकर्त्यांना आकर्षित केले. यामुळे पक्षाला ‘वाढ’ झाल्याचा भास झाला. मात्र, ती केवळ ‘सूज’ होती हे आता स्पष्ट झाले आहे.
ते पुढे म्हणाले, ‘‘सिंधुदुर्गात भाजपचे नेतृत्व प्रभाकर सावंत अथवा रवींद्र चव्हाण यांच्याकडे नाही तर राणे कुटुंबाकडे आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. जिल्ह्यात भाजपचे खासदार, राज्यात मुख्यमंत्री, जिल्ह्याचे सुपुत्र प्रदेशाध्यक्ष आणि देशाचे पंतप्रधान भाजपचे असतानाही कार्यकर्ते आमिषांना भुलून पक्ष सोडत आहेत. यामुळे प्रभाकर सावंत यांच्या हतबलतेचे चित्र स्पष्ट झाले आहे. रवींद्र चव्हाण यांनी भाजप पक्ष वाढवला. मात्र, एका वर्षात तो कोलमडत असल्याचे सिंधुदुर्गवासीय पाहत आहेत.’’
-------------
...तर सावंतांसारखे मोजके कार्यकर्तेच राहतील
नाईक यांनी प्रभाकर सावंत यांना सल्ला देताना म्हटले आहे, ‘‘अजूनही वेळ गेलेली नाही. रसद पुरविण्याचे बंद करा, मतदारांची आणि जनतेची कामे करा आणि विचारांद्वारे कार्यकर्ते घडवा. उद्या सत्ता बदलली तर राणे कुटुंब ज्या पक्षात जाईल, त्या पक्षात त्यांचे कार्यकर्ते जातील आणि सावंत यांच्यासारखे मोजके कार्यकर्तेच भाजपमध्ये राहतील.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.