कोकण

रत्नागिरी-वायू, रसायन वाहणाऱ्या टॅंकरच्या अपघाताचे धडे

CD

81000

दखल - लोगो

इंट्रो

मुंबई-गोवा महामार्ग गेल्या दोन महिन्यांत वाहतूक एकदा १२ तास आणि दुसऱ्यांदा १६ तास बंद ठेवण्याची वेळ आली. या मार्गाला चांगला पर्यायी मार्ग नसल्यामुळे हा वेळ आहे त्यापेक्षा अधिक भासतो. महामार्गावर रखडलेल्या प्रवाशांची हालत अतिशय दयनीय होते. रसायने अथवा रासायनिक पदार्थ किंवा ज्वालाग्राही वायू, मानवी जीवनाला धोकादायक ठरणारा वायू वाहून नेणारे टँकर या महामार्गावरून दिवसाला शेकड्यागणिक धावत असतात. त्यांना अपघात झाला की, रसायनांची अथवा ज्वालाग्राही वायूची गळती अपरिहार्य असते. अशा गळतीने हाहाकार आजवर उडाला नाही. यात मानवी कौशल्य अथवा नियोजनापेक्षा नशिबाचाच भाग अधिक आहे. यावर भक्कम यंत्रणा कधी उभी राहणार?

- शिरीष दामले, रत्नागिरी
----
वायू, रसायन वाहणाऱ्या टॅंकरच्या अपघाताचे धडे

जून महिन्यात बावनदीनजीक ज्वालाग्राही वायू नेणारा टँकर आणि मिनीबस यांच्यात धडक झाली. टँकरने काही काळ पेट घेतला. सुदैवाने, तो रस्त्याच्या बाजूला खाली पडला. आता सोमवारी रात्री हातखंब्याजवळ एलपीजी वाहून नेणारा टँकर उलटला आणि १६ तास वाहतूक बंद झाली. लोकांचे स्थलांतर करावे लागले. या आधी झालेल्या अपघातांमध्ये कशेडी घाटात लोकवस्तीजवळ टँकर उलटल्याने तेथील लोकांचे स्थलांतर करण्याची वेळ आली होती. अशा टँकरच्या वाहतुकीसाठी सुरक्षिततेचे असलेले निकष पाळले जातात की, नाहीत याबाबत संबंधित खात्यालाच काय ते माहीत. जोवर मोठा अपघात होत नाही तोवर यातले काही बाहेर फुटत नाही एवढेच. एकूणच व्यवस्था किडलेली असल्यामुळे मूळ टँकरची बांधणी सदोष आहे का? टँकरमधील पदार्थ धोकादायक असेल, तर त्याबाबत पुरेशी काळजी घेतली आहे का? टँकरचालक पुरेसा प्रशिक्षित आहे का? तो सुशिक्षित आहे का? आयत्यावेळी अपघातानंतर काय माहिती दिली पाहिजे, याची जाणीव संबंधित चालकाला असणे आवश्यक, ती आहे का, असे अनेक प्रश्न कायमचे विचारता येतील. किंबहुना यापैकी काहीही पाळले जात नसावे, अशीच शंका घ्यायला जागा आहे. १५ वर्षांपूर्वी प्रा. सुरेश बारटक्के यांनी अशा टँकरचे वर्णन महामार्गावरील धावत्या आगपेट्या अशा चपखल शब्दांत केले होते. आज दळणवळणाची साधने वाढल्याने धोका लवकर दूर करता येतो; मात्र निर्माण होणारा धोका कमीत कमी असेल अथवा त्यावर लगेच उपाययोजना करता येईल, अशी यंत्रणा उभारण्याची इच्छा आहे का, असा प्रश्न पडतो.
रत्नागिरीनजीक असलेल्या औद्योगिक आस्थापनांमध्येही किंवा सरकारी खात्यांत गळती बंद करण्यासाठी आवश्यक ते मनुष्यबळ आणि सोयीसुविधा पुरेशा नाहीत. या कंपनीतील तज्ज्ञ पकड किंवा दुसऱ्या कंपनीतील कोणाला तरी बोलावं आणि गळती थांबवली म्हणून पाठ थोपटून घे, असे यंत्रणेचे चालले आहे. महामार्गावर टँकर तर धावणारच; मात्र अपघात झाल्यावर त्याची तीव्रता कमी करण्यासाठी सज्ज असले पाहिजे. महामार्ग दीर्घकाळ बंद राहणे हा तर आणखी एक व्यवस्थाशून्यतेचा भाग. तेथे पर्यायी व्यवस्था हा कळीचा मुद्दा. सध्या महामार्गाचे जे काही चालू आहे त्यावर अधिक मल्लिनाथीची गरज नाही. त्यातच अशा टँकरच्या अपघातांची भर आणि वायूगळतीचा धोका म्हणजे आपल्या व्यवस्थेची लाजिरवाणी अवस्था आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs SL Live : पाकिस्तानचा विजय अन् श्रीलंकेचे पॅकअप! फायनलमध्ये IND vs PAK होऊ शकते मॅच... ; जाणून घ्या गणित

PAK vs SL Live : पाकिस्तानच्या अब्रार अहमदची 'मस्ती' त्याच्याच अंगलट आली, Wanindu Hasaranga ने बघा कशी लाज काढली Video Viral

Donald Trump: रशियाला निधी पुरवला; युक्रेन युद्धासाठी भारत-चीन जबाबदार, डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट आरोप

Mumbai News: शिंदे गटाच्या प्रचाराचा नारळ फुटणार! एकनाथ शिंदे मेळावा घेणार; कधी आणि कुठे? जाणून घ्या...

ST Bank Annual Report: छत्रपती शिवाजी महाराजांसोबत नथुराम गोडसेचा फोटो; एसटी बँकेच्या वार्षिक अहवालावरून नवा वाद उफाळला

SCROLL FOR NEXT