कोकण

म्हापण पंचक्रोशीला विजेचे ‘ग्रहण’

CD

81055


म्हापण पंचक्रोशीला विजेचे ‘ग्रहण’

ग्रामस्थ, व्यावसायिक त्रस्त; त्वरित उपाय योजण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
म्हापण, ता. ३० ः म्हापण पंचक्रोशीतील सर्व गावांमध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने ग्राहकांतून संताप व्यक्त होत आहे. पाट, म्हापण, कोचरे, केळुस, आंदुर्ले या गावांमध्ये विजेच्या समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. याचा फटका सामान्य ग्राहकांसह व्यावसायिकांना बसत आहे. गणेश चतुर्थीपूर्वी वीजपुरवठा सुरळीत करून ग्राहकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.
कुडाळ शहरापासून दूर असलेल्या सर्व गावांचे ग्रामस्थ म्हापण बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी येतात. अशातच अनेकदा म्हापण गावात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने दुग्धजन्य पदार्थ, आईस्क्रीमसह पावाची भट्टी आदी बंद असल्याने अनेक हॉटेल व्यावसायिक, दुकानदारांचे नुकसान होत आहे. ग्राहकांना परत पाठवावे लागत आहे. याचा सर्वाधिक फटका लघुउद्योजकांना बसताना दिसतो. नाशवंत पदार्थ अक्षरशः फेकून द्यावे लागत आहेत. म्हापणमध्ये लवकरच ‘कायाकिंग’ पुन्हा सुरू होणार आहे. विद्युत पुरवठा असाच खंडित होत राहिला, तर पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होणार आहे. म्हापण बाजारपेठेतील‌ व्यावसायिकांनाही मोठा फटका बसू शकतो. आता गणेशचतुर्थी जवळ येत आहे. म्हापण बाजारपेठेत पूर्वतयारीची लगबग सुरू झाली आहे. लवकरच म्हापण बाजारपेठ विविध शोभिवंत वस्तूंनी सजलेली दिसेल. मात्र, वीज नसल्यास व्यवसायावर मोठा परिणाम होणार आहे. विजेच्या खेळखंडोबामुळे गणेश चित्रशाळांमध्ये कामे खोळंबली आहेत.
प्रामुख्याने म्हापण पंचक्रोशीतील खवणे, मळई, आंबेव्हाळ, पागेरे, राठवळवाडी, हरिजनवाडी, खालची ठाकूरवाडी, कोनीवाडी हा भाग बहुतांश वेळ काळोखातच असतो. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेकदा तक्रार करूनही कोणत्याही प्रकारची कायमस्वरुपी उपाययोजना केली जात नाही. या भागात बिबट्या, नाग, अजगर, वटवाघुळ यांचा वावर असतो. काळोखातून येथील ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. म्हापण गावाला अद्याप वायरमन न दिल्याने वीज खंडित झाल्यास तक्रार कोणाकडे द्यावी, हा प्रश्न पडतो. दुसऱ्या गावातील वायरमन येण्यास विलंब होतो. त्यामुळे गावकऱ्यांना अनेकदा काळोखात राहावे लागते.
.............
पाट वीज कार्यालय असून नसल्यासारखे
पाटमध्ये महावितरण कार्यालय असले, तरी ते केवळ नावाला आहे. तेथे कोणतेही अधिकारी नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांना थेट कुडाळ कार्यालयात जावे लागते. नवी जोडणी, मीटर हवा असल्यास सहजासहजी उपलब्ध होत नाही. साधे फ्यूज गेले तरी पाट कार्यालयात तेही उपलब्ध नसतात. त्यामुळे या कार्यालयाला कोणी वाली नाही. गणेश चतुर्थीआधी पाट कार्यालयातील रिक्त जागा भरून तेथे अधिकारी नियुक्त करावे तथा महावितरणला आवश्‍यक साहित्य तेथे उपलब्ध करावे. म्हापण गावाला कायमस्वरुपी वायरमन व लाईनमन द्यावा, अशी मागणी म्हापण पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी केली आहे. कुडाळ विद्युत कार्यालय याबाबत निर्णय घेणार की पुन्हा दुर्लक्ष केले जाणार, याबाबत ग्रामस्थांमध्ये संभ्रम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price Today: गुंतवणूकदारांना खरेदीची संधी? सोन्या-चांदीच्या भावात मोठी घसरण, काय आहे आजचा भाव?

PM मोदींनी तब्बल 7 तास घालवला होता 'वनतारा'मध्ये वेळ; 'महादेवी'मुळे वनतारा चर्चेत, अंबानींशी त्याचा काय संबंध?

Devendra Fadnavis: ''मंत्रिपदाची चर्चा धनंजय मुंडेंच्या स्तरावर होत नसते'', मुख्यमंत्री फडणवीसांनी फटकारलं

Latest Marathi News Updates: वांद्रे पूर्वेतील भाटिया मेडिकलच्या आईस्क्रीममध्ये अळी; ग्राहक संतप्त, चौकशी सुरू

Stock Market: टॅरिफ एक आठवड्यासाठी पुढे ढकलला; शेअर बाजाराचे जोरदार 'कमबॅक', कोणते शेअर्स वधारले?

SCROLL FOR NEXT