कोकण

सदर

CD

लोगो-----------आरोग्यभान ः वैयक्तीक - सार्वजनिक
(२५ जुलै टुडे ४)
स्पॉन्डीलोसिससाठी वयोमानामुळे होणारे बदल हे मुख्य कारण असले तरी बदलत्या जीवनशैलीमुळे तरुण पिढीमध्येसुद्धा याचे प्रमाण वाढू लागले आहे. वाढते वजन, व्यायामाचा अभाव, वाढता प्रवास, रस्त्यावरील खड्ड्यांमुळे जोखमीचा प्रवास याला कारणीभूत ठरत आहे. जड व वाकून करावी लागणारी कामे तसेच सतत कित्येक तास बसून कामे केल्याने स्पॉन्डीलोसिस होऊ शकतो. मणक्याचा वात व दुखापतसुद्धा कारणीभूत ठरू शकते.
- rat३१p६.jpg-
P25N81168
- डॉ. विष्णू माधव
अस्थीरोगतज्ज्ञ, चिपळूण
---
बदलत्या जीवनशैलीमुळे
मणक्याचे वाढते आजार
स्पॉन्डीलोसिस म्हणजे पाठीतील मणका, त्यातील सांधे, चकत्या व त्याभोवती असणाऱ्या स्नायू यांच्यामधील होणारे बदल. जेव्हा या बदलांमुळे शरीराला अपाय होतो व लक्षणे दिसू लागतात तेव्हा त्याला स्पॉन्डीलायटिस्ट असे म्हणतात. आपला मणका अशी एक मण्यांची माळ आहे जी आपला भार झेलते व शरीराला लवचिकता देते. त्याचा मुख्य घटक मणी व त्यांच्यामधील चकत्या या भार झेलतात व शॉक अॅबसॉर्बरसारखे काम करतात. या चकतीचा गाभा (annulus pulposus) हा जेलीसारखा पदार्थ असतो जो एखाद्या स्प्रिंगसारखं काम करतो. याला मण्यांच्या मर्यादेमध्ये बांधून ठेवण्यासाठी घट्ट रिंगण असते. या सर्वांना जोडण्यासाठी अनेक छोटे सांधे व सांधेबंध/लीगामेंट्स असतात. मणक्यामधून आपल्या मेंदूला शरीराबरोबर जोडणारा मज्जारज्जू असतो. मज्जारज्जू मेंदूचे संदेश मज्जातंतूच्या माध्यमातून स्नायूंना पोहोचवतो व शरीराला जाणवणाऱ्या संवेदना मेंदूला कळवतो.
वाढत्या वयामुळे किंवा इतर काही कारणांनी जेव्हा या रचनेचा ऱ्हास होतो तेव्हा त्याला स्पॉन्डीलोसिस (spondylosis) असं म्हणतात. सर्वसाधारणपणे मान व कंबर या मधील मणक्यात हा बदल उद्भवतो व इतर मणक्यात हा क्वचित आढळून येतो. बऱ्याच रुग्णांना बरीच वर्षे काहीही त्रास जाणवत नाही. शुल्लक वाटणाऱ्या दुखापतीने मग याची सुरुवात होते. याची लक्षणे असलेल्या रुग्णांचे ३ गट प्रामुख्याने आढळून येतात.
जीवनशैलीतील बदल हेही फार आवश्यक असतात जसे की, वजन कमी करणे, संतुलित आहार घेणे व नियमित व्यायाम करणे. ज्या गोष्टींनी मणक्याचा त्रास वाढू शकतो त्या टाळल्या पाहिजेत उदाहरणार्थ, वाकून कामे करणे, जड वस्तू उचलणे. बसून काम असल्यास तासाभराने उठून अंग मोकळं करणे. कॉम्प्युटर व इतर बैठ्या कामांमध्ये बैठक योग्य ठेवणे. दुचाकी व इतर वाहने कमीत कमी प्रमाणात व खड्डे, गतिरोधक सांभाळून चालवणे. धूम्रपान, मद्यपानसारखी व्यसने टाळावीत.
व्यायामाचे सांध्यांच्या हालचालींमध्ये लवचिकपणा व संतुलन सुधारणे,आयसोमेट्रिक व्यायामाने स्नायूं बळकट करणे व स्नायूंना ताण देऊन त्यांची लवचिकता वाढवणे हे तीन हेतू असतात. कमरेला व मानेला दिलेले पट्टे हे निव्वळ संरक्षक म्हणून वापरले जातात उपचार म्हणून नव्हे. वरील सर्व उपचार तोकडे पडल्यास मात्र शस्त्रक्रिया करावी लागते. यात डिस्केक्टमी म्हणजे त्रासदायक चकती काढणे, लॅमिनेक्टमी म्हणजे मज्जातंतू मोकळे करण्यासाठी हाडे कापून दोन मणक्यातील जागा मोठी करणे व स्टॅबिलायझेशन म्हणजे धातूची सळई किंवा हाडाचे रोपण करून दुखरे मणके एकसंध करणे/ जोडणे सुदैवाने ९० टक्के रुग्णांना शस्त्रक्रिया करावी लागत नाही. योग्य व पुरेसा व्यायाम व इतर उपायांनी spondylosis पासून दीर्घकाळ वेदनामुक्त आयुष्य जगता येते.

(लेखक चिपळुणात हाडाचे डॉंक्टर आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 5th Test: भारताचे जबरदस्त कमबॅक! मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णाच्या तिखट माऱ्यानंतर यशस्वी जैस्वालचा प्रहार

Prajwal Revanna : माजी पंतप्रधानांच्या नातवाने केले शेकडो महिलांचे लैंगिक शोषण; हजारो अश्लील व्हिडिओ, कोर्ट उद्या सुनावणार शिक्षा

IND vs ENG 5th Test: तू आम्हाला गप्प बसायला काय सांगतोस? KL Rahul भर मैदानात अम्पायरला भिडला! प्रसिद्ध कृष्णा-जो रूट यांच्या वादात उडी Video Viral

Onion Rate Decrease : कांदा दर घसरले! शेतकरी अडचणीत; साठवणुकीवर दिला जातोय भर

Mumbai News : योगेश कदम यांच्याकडून ‘सावली बार’ ऑर्केस्ट्राचा परवाना परत

SCROLL FOR NEXT