कोकण

रक्षाबंधनाची बाजारपेठेला चाहुल

CD

swt315.jpg
81198
म्हापण ः येथील बाजारपेठांत राखी खरेदीसाठी झालेली गर्दी.

रक्षाबंधनाची बाजारपेठेला चाहुल
खरेदीसाठी लगबग ः म्हापणमध्ये दुकाने सजली
म्हापण, ता. ३१ ः श्रावणाबरोबरच सणांची सुरुवाती झाली आहे. यात महत्त्वाचा असलेल्या रक्षाबंधनाची चाहुल बाजारपेठांना लागली आहे. यानिमित्ताने म्हापण बाजारपेठेतील दुकाने राख्यांनी सजली असून, खरेदीसाठी बाजारात मोठ्या प्रमाणात लगबग पाहावयास मिळत आहे.
म्हापण बाजारपेठ पंचक्रोशीतील मोठी बाजारपेठ असून या बाजारपेठेत पंचक्रोशीतील खवणे ,मळई, निवती,श्रीरामवाडी, परुळे आदी भागातील भगिनी मोठ्या प्रमाणात बाजारात राख्या खरेदी करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे .काही भगिनीं कडून काही दिवस अगोदरच राखी खरेदी करून पोस्टाने आपल्या भावाला पाठवली जाते.
दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी वेगवेगळे मनी, खडे वापरून बनवण्यात आलेल्या राख्या भगिनींचे मन आकर्षित करत असून खड्यांच्या राख्यांना अधिक पसंत असल्याचे दुकानदारांकडून सांगण्यात येत आहे. तसेच लहान मुलांच्या पसंतीचे कार्टून फुलांसारख्या राख्या ही बाजार उपलब्ध झाले आहेत. श्रावण पौर्णिमा राखी पौर्णिमा शनिवार ९ ऑगस्टला रक्षाबंधन असून या दिवशी आपल्या भावाच्या हातात राखी बांधून बहीण भाऊ रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात .केवळ हिंदू धर्मामध्ये नव्हे तर इतर धर्मियांमध्ये हा सण सुद्धा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. रक्षाबंधन निमित्त सोशल मीडियावर देखील शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला असून परगावी राहणाऱ्या भावाला बहिणींकडून आठ दिवस अगोदरच पोस्टाने किंवा कुरिअरने आवर्जून राखी पाठवली जाते. त्यामुळे म्हापण बाजारपेठेत राखी खरेदीसाठी लगबग बाजारपेठेत पहावयास मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गुंड पाळू नका, दोन घास कमी खा पण स्वाभिमानाने रहा; खोटं काम....; पंकजा मुंडे काय म्हणाल्या?

Dhananjay Munde: काही जणांना आता ओबीसीतून आरक्षण हवं पण... धनंजय मुंडे पहिल्यांदा आरक्षणावर बोलले, भगवानगडावर वादळी भाषण

Dussehra Melava 2025 Live Update: मी आहे तोपर्यंत माझ्या लेकरांना आरक्षण दिलेलं मला बघायचं आहे- जरांगे पाटील

Kolhapur Shahi Dussehra : शाही दसरा सोहळा, अडीचशे वर्षांची परंपरा; हत्तींची जागा घेतली मेबॅक मोटारीने, छत्रपतींची अगवाणी पोलिस दलाकडून

Nashik News : 'पिवळं सोनं' महागलं! दसऱ्यासाठी गोदाघाटावर झेंडू फुलांची मोठी आवक, किलोला दीडशे रुपये दर

SCROLL FOR NEXT