कोकण

शिडवणेत ''कृषी माहिती केंद्र'' स्थापन

CD

swt3110.jpg
81210
सांगुळवाडीः कृषिदूतांकडून शेतकऱ्यांसाठी योजनांची माहिती देण्यासाठी सुरू केलेल्या कृषी माहिती केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित मान्यवर व शेतकरी.

शिडवणेत ‘कृषी माहिती केंद्र’ स्थापन
कृषिदूतांचा पुढाकारः कृषी योजना, फळझाडांविषयी मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. ३१ : शिडवणे गावातील शेतकऱ्यांसाठी सांगुळवाडी कृषी महाविद्यालयाच्या दहा विद्यार्थ्यांनी ''कृषी माहिती केंद्र'' स्थापन केले. या महत्त्वाकांक्षी उपक्रमाद्वारे शेतकऱ्यांना विविध कृषी योजना आणि फळझाडांविषयी सविस्तर माहिती दिली. या उपक्रमाचा जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा शिडवणे नं. १ शाळेत आयोजित कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांनी लाभ घेतला.
यासाठी भोवडवाडी येथील राहुल पळसकर, निशांत माने, पृथ्वीराज नरके, तेजस येडगे, सय्यद उस्मान, दिग्विजय जांभळकर, वैभव संकपाळ, हृतेश यादव, अभंग सलगर आणि व्यंकटेश रेड्डी या कृषिदूतांनी सहभाग घेतला. या विद्यार्थ्यांनी १८ ते २० तक्त्यांच्या साहाय्याने सोप्या पद्धतीने कृषी योजनांची माहिती तसेच फळबाग लागवड आणि त्यांच्या संगोपनाविषयी मार्गदर्शन केले. यावेळी निवृत्त पोलिस अधिकारी विजय टक्के, शिडवणे गावठणवाडी उत्कर्ष मंडळाचे वाडीप्रमुख सदाशिव कुडतरकर, मुंबई स्थित सदस्य मंगेश शेट्ये व विजय शेट्ये, ग्रामपंचायत सदस्य दयानंद कुडतरकर व संतोष टक्के, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनेश रांबाडे व उपाध्यक्षा संचिता टक्के, शिडवणे आरोग्य मंदिर अधिकारी प्रणव पाटील, आरोग्य सेवक गणेश तेली, अरविंद धाक्रस, उर्मिला सुतार, सायली सुतार, जान्हवी टक्के, निशा कुडतरकर, प्रेरणा कासार्डेकर, तारीफ शेख, समीक्षा सुतार, वैभव पाटणकर, विराज शेट्ये आदींनी या कृषी माहिती केंद्राला भेट देत कौतुक केले.
अंगणवाडी सेविका प्रियांका पाटणकर, मदतनीस कविता केतकर, शालेय पोषण आहार स्वयंपाकी समिता सुतार, शिडवणे कोनेवाडी अंगणवाडी सेविका शालिनी शिर्सेकर, समाधान पाटणकर यांचीही उपस्थिती होती. शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण कुबल, उपमुख्याध्यापिका सीमा वरुणकर, पदवीधर शिक्षिका हेमा वंजारी आणि क्रीडाशिक्षक सुरेंद्र यादव यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. मुख्याध्यापक प्रवीण कुबल यांनी कृषिदूतांचे व सांगुळवाडी कृषी महाविद्यालयाचे आभार मानले.

चौकुळ
ग्रामीण विकासात कृषिदूतांचे योगदान
यापूर्वीही या कृषिदूतांनी शिडवणे शाळेमध्ये अनेक विधायक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. यामध्ये वृक्षारोपण, रंगभरण स्पर्धा, ‘बांधावरची शाळा’, नागोबा मूर्ती स्पर्धा आदींचा समावेश आहे. त्यांचे हे प्रयत्न ग्रामीण भागातील विकास आणि सामाजिक जागृतीसाठी महत्त्वाचे ठरत असल्याने ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा अ‍ॅक्शन मोड! 65 इमारती प्रकरणातील फसवणूकदारांना शोधून गुन्हे दाखल करा, पालिकेला निर्देश

Police Accident : राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; दोन पोलिसांसह तिघांचा दुर्दैवी अंत, दोघांच ठरलं होतं लग्न

जुबीन गर्ग लाइफ जॅकेटशिवाय उतरले, नंतर बेशुद्धावस्थेत तंरगताना आढळले; मृत्यू कसा झाला? शेवटचा VIDEO आला समोर

Latest Marathi News Live Update : नवरात्रोत्सवातील गरबा फक्त हिंदूसाठी, मुस्लीमांना प्रवेश देऊ नका - VHP

Panchang 20 September 2025: आजच्या दिवशी काळे तिळ किंवा हळद वनस्पतीचे चूर्ण पाण्यात टाकून स्नान करावे

SCROLL FOR NEXT