कोकण

रत्नागिरी-जिल्हा सहकारी बोर्डाच्या अध्यक्षपदी हेमंत वणजू

CD

-rat1p23.jpg-
81480
हेमंत वणजू, प्रताप सावंत

जिल्हा सहकारी बोर्डाच्या
अध्यक्षपदी हेमंत वणजू
उपाध्यक्षपदी प्रताप सावंत; सहकार पॅनेलने १६ जागा जिंकल्या
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २ : रत्नागिरी जिल्हा सहकारी बोर्डाच्या अध्यक्षपदी पत्रकार हेमंत वणजू यांची तर उपाध्यक्षपदी प्रताप सावंत यांची निवड करण्यात आली. कृषिभूषण डॉ. तानाजी चोरगे यांच्या नेतृत्वाखाली ''सहकार पॅनल''ने या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला होता. त्यानंतर अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची अंतर्गत निवडीची घोषणा करण्यात आली.
जिल्हा सहकारी बोर्डाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ''सहकार पॅनेल''ने १७ पैकी तब्बल १६ जागा जिंकल्या. ही निवडणूक जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजी चोरगे आणि जिल्हा सहकारी बोर्डाचे विद्यमान अध्यक्ष प्रभाकर शेट्ये यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात आली होती. ''उद्धव बाळासाहेब ठाकरे'' (उबाठा) गटाकडून सहकार पॅनलविरोधात उमेदवार उभे करण्यात आले होते. आमदार किरण सामंत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्यात चर्चा झाल्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी उबाठा गटाने आपले सर्व उमेदवार मागे घेतले. यामुळे सहकार पॅनलचे १४ उमेदवार बिनविरोध निवडून आले. यात रामचंद्र गराटे, प्रभाकर शेट्ये, चंद्रकांत परवडी, रमेश दळवी, अविनाश जाधव, सिराज घारे, सुनील टेरवकर, प्रताप सावंत, प्रसन्न दामले, सुरेंद्र लाड, मनोज कदम, हेमंत वणजू, स्मिता दळवी आणि प्राची टिळेकर यांचा समावेश आहे. आज सकाळी ११ वाजता अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड करण्यासाठी निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला. त्यानुसार पत्रकार हेमंत वणजू यांची अध्यक्ष म्हणून आणि प्रताप सावंत यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चोराच्या उलट्या बोंबा! स्वत: चेक फेकून दिला अन् म्हणे भारतानं अपमान केला, पाकिस्तानच्या कर्णधाराचं रडगाणं

Junnar News : मद्यपी डॉक्टरकडून शवविच्छेदनाचा प्रयत्न, जुन्नरच्‍या ग्रामीण रुग्‍णालयातील प्रकार; आरोग्य विभागाकडून चौकशी

India Denied Asia Cup 2025 Trophy : टीम इंडियाला अखेर ट्रॉफी मिळाली? सुर्यकुमार यादवसह भारतीय खेळाडूंनी शेअर केले फोटो

सांगली हादरली! चाकूने गळा चिरून पत्नीचा निर्घृण खून; घराला कडी लावून पतीनं गाठलं पोलिस ठाणं, रक्ताच्या थारोळ्यात काजल पडलेली अन्...

Panchang 29 September 2025: आजच्या दिवशी शिव कवच पठण व ‘सों सोमाय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT