कोकण

८ डब्यांच्या अनारक्षित मेमू रेल्वेबाबत नाराजी

CD

(रेल्वेचे चित्र वापरावे )

‘अनारक्षित मेमू रेल्वे’बाबत नाराजी
कोकण विकास समिती ; प्रत्यक्ष लाभ कमी प्रवाशांना
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २ : गणेशोत्सवासाठी मध्यरेल्वेने जाहीर केलेल्या दिवा-चिपळूण आणि दिवा-खेड या दोन ८ डब्यांच्या अनारक्षित मेमू रेल्वेगाडीवरून कोकणात नाराजी व्यक्त केली जात आहे.
कोकण विकास समितीने या गाड्यांचा लाभ फक्त मर्यादित प्रवाशांनाच होणार असल्याचे सांगत, मध्यरेल्वेला २४ डब्यांच्या पारंपरिक लोको-हॉल्ड रेकसह या गाड्या दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, वांद्रे टर्मिनस किंवा बोरिवली येथून चालवण्याची मागणी केली आहे.
समितीच्या म्हणण्यानुसार, परळ, दादर, माहिम, अंधेरी, गिरगाव, लालबाग, सांताक्रुज, बोरिवली, भाईंदर, वसई, ठाणे आणि घाटकोपर परिसरातील लाखो चाकरमानी प्रवाशांना पनवेल किंवा दिवा येथे पोहोचणे गैरसोयीचे ठरते. त्यामुळे घोषित केलेल्या मेमू गाड्यांचा प्रत्यक्ष लाभ फार कमी प्रवाशांना मिळेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. ८ डब्यांच्या मेमू गाड्यांवर आक्षेप घेत गणेशोत्सवातील प्रचंड गर्दी पाहता केवळ ८ डब्यांच्या मेमू गाड्या देणे, हा अप्रस्तूत आणि असमर्थनीय निर्णय असल्याचे कोकण विकास समितीने म्हटले आहे.
खेळण्यातील गाडीप्रमाणे दिलेल्या या गाड्या गर्दीवर किती नियंत्रण मिळवणार? हा संशोधनाचा विषय असल्याचेही पत्रात नमूद केले आहे. त्यात अनारक्षित डब्यांची समस्या भेडसावत असताना संपूर्ण अनारक्षित गाड्यांमध्ये आरक्षणाची कोणतीही हमी नसल्यामुळे पुढील स्थानकांवरील प्रवाशांना जागा मिळत नाही. यामुळे गाड्यांची संख्या वाढलेली दिसत असली तरी त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळत नाही, असे समितीने निदर्शनास आणले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar : भाजप, आरएसएसच्या विचारसरणीत ‘मदत’ हा शब्दच नाही; ‘वंचित’चे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांची टीका

Pune News : महापालिकेची प्रभाग रचना सोमवारपर्यंत जाहीर होणार

Pune Crime : कुख्यात गुंड नीलेश घायवळचा पासपोर्ट रद्द करणार - पोलिस आयुक्त अमितेश कुमार

Latest Marathi News Live Update: नगरपरिषद, नगरपंचायत नगराध्यक्ष आरक्षण सोडत ६ ऑक्टोबरला

Mumbai Water Supply : मुंबईकरहो पाणी जपून वापरा, तब्बल तीन दिवस होणार पाणी कपात; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT