कोकण

कामथे खुर्दमध्ये एक पेड मॉं के नाम उपक्रम

CD

-rat२p९.jpg-
२५N८१६८६
चिपळूण ः कामथे येथे ‘एक पेड माँ के नामर् उपक्रमात वृक्ष लागवडीसाठी उपस्थित विद्यार्थी आणि ग्रामस्थ.
-------
कामथे खुर्दमध्ये ‘एक पेड मॉं के नाम’
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २ : नारी सन्मान प्रतिष्ठान आणि ग्रामपंचायत कामथे खुर्द यांच्या संयुक्त विद्यमाने एक पेड माँ के नाम या संकल्पनेअंतर्गत पुढील पिढीला देऊ ज्ञान, वृक्ष लागवड राबवू, हा पर्यावरणपूरक उपक्रम मोठ्या उत्साहात झाला. कामथे खुर्द येथील जिल्हा परिषद शाळा क्र. २ च्या आवारात आणि शेजारील निवडलेल्या जागेत या उपक्रमाअंतर्गत वृक्षारोपण आणि रोपवाटप करण्यात आले.
कार्यक्रमाला सरपंच सरस्वती हरेकर, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे स्थानिक प्रतिनिधी बाळासाहेब हरेकर, माजी उपाध्यक्ष किरण हरेकर, ग्रामपंचायत सदस्या अन्विता हरेकर, समिती सदस्या अमृता हरेकर, मयूरी सन्नाक, मुख्याध्यापक बजरंग गुरसळे, शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपक्रमात २०० झाडांची लागवड व १०० रोपांचे वाटप करण्यात आले. काजू, जांभूळ, आवळा, बहावा, करंज, कांचन, साग अशा स्थानिक व उपयोगी झाडांचा समावेश होता. या रोपांची उपलब्धता वनविभाग, चिपळूण व वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयामार्फत मोफत करण्यात आली. रोपे लावण्यासाठी आवश्यक जागा बाळासाहेब हरेकर यांनी विनामूल्य उपलब्ध करून दिली. त्यांचा सन्मान नारी सन्मान प्रतिष्ठानचे विश्वस्त सल्लागार यशवंत पेढांबकर यांच्या हस्ते करण्यात आला. सरपंच सरस्वती हरेकर यांचा पर्यावरणस्नेही वृत्तीबद्दल सन्मान वृक्ष देऊन करण्यात आला.

--------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Blast Update : दिल्ली स्फोटातील गाडी नेमकी कुणाची? महत्त्वाची अपडेट समोर...

Amit Shah on Delhi Red Fort Blast : दिल्ली लाल किल्ला स्फोटानंतर गृहमंत्री अमित शहांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Delhi Red Fort blast Live Update : मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी रूग्णालयात जाऊन घेतली जखमींची भेट; घटनास्थळाचीही पाहणी केली

Maharashtra Alert Delhi Blast : RSS कार्यालय ते मुंबईची IMP ठिकाणे; पुणे, कोल्हापुरात हाय अलर्ट, दिल्ली बॉम्ब हल्ल्यानंतर पोलिस प्रशासनाचा डोळ्यात तेल घालून तपास

Maharashtra Alert Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर महाराष्ट्रात जोरदार हालचाली, पुण्यात अलर्ट; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ‘वर्षा’वर पोलिसांची घेतली बैठक

SCROLL FOR NEXT