कोकण

Konkan Railway: कोकण रेल्वेविरोधात १५ रोजी खेडमध्ये आंदोलन

प्रवाशांच्या मागण्यांसाठी खेडमध्ये जल फाउंडेशनचे लाक्षणिक उपोषण

CD

‘कोरे’विरोधात १५ ला खेडमध्ये आंदोलन
जल फाउंडेशनचा पुढाकार; रत्नागिरी-पॅसेंजर दादरपर्यंत चालवा
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. ५ : मध्यरेल्वे व कोकण रेल्वे प्रशासनाकडून कोकणातील प्रवाशांच्या मागण्यांकडे सातत्याने होत असलेल्या दुर्लक्षाविरोधात जल फाउंडेशनने आक्रमक भूमिका घेतली आहे. स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट रोजी खेड रेल्वेस्थानकासमोर लाक्षणिक उपोषण करणार असल्याचा इशारा जल फाउंडेशनचे अध्यक्ष नितीन जाधव यांनी सांगितले.
मागील चार वर्षांपासून विविध स्तरांवर पत्रव्यवहार, बैठका, निवेदने या द्वारे केलेल्या मागण्यांकडे रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे आंदोलनाशिवाय पर्याय उरलेला नाही. रत्नागिरी-पॅसेंजर गाडी दादरपर्यंत चालवावी आणि चार डबे आरक्षणासाठी उपलब्ध करून द्यावेत, करमाळी–एलटीटी एक्स्प्रेसमध्ये रत्नागिरी रिमोट कोटा ५० टक्क्यापर्यंत वाढवावा. मांडवी, जनशताब्दी, तेजस, मडगाव-एलटीटी अशा प्रमुख गाड्यांमध्ये सर्व स्थानकांना समान कोटा मिळावा. मुंबई–चिपळूणदरम्यान दैनंदिन नवी गाडी सुरू करावी, जी खेड व इतर स्थानकांवर थांबेल. मांडवी एक्सप्रेसमधील स्लीपर डबे पूर्ववत द्वितीय श्रेणी आरक्षित म्हणून बदलावेत. एलटीटी, पुणे, गोवा संपर्क क्रांती, गरीबरथ, तिरूनेलवेली, हिसार–कोयंबतूर आदी गाड्यांना खेड रेल्वेस्थानकावर थांबा द्यावा. या मागण्यांबाबत केंद्र व रेल्वे मंत्रालयाने तातडीने लक्ष घालावे अन्यथा व्यापक स्वरूपातील आंदोलन छेडले जाईल, असा इशारा जल फाउंडेशनने दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सोनं-चांदीच्या दरात वाढ, सोनं ४३० रुपयांनी महागलं, आजचे दर काय? जाणून घ्या...

उत्तर प्रदेशात जातीवर आधारित रॅलींवर बंदी; सरकारी कागदपत्रांमधूनही हटणार जातीचा कॉलम, High Court च्या आदेशानंतर ऐतिहासिक निर्णय

Latest Marathi News live Updates : भुजबळांच्या हस्ते घटस्थापना होऊन देवीचे घेतले दर्शन

Flight Safety Tips: टेकऑफ-लँडिंगवेळी एअर होस्टेस खिडकीचे शेड्स का उघडायला सांगतात? जाणून घ्या यामागचं खरं कारण

Navaratri 2025 Zodiac Mantras: दुर्गा देवीचे 12 राशींसाठी खास मंत्र, वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT