कोकण

नारळी पौर्णिमानिमित्त शुक्रवारी सुट्टी

CD

नारळी पौर्णिमानिमित्त
शुक्रवारी सुट्टी
रत्नागिरी : नारळी पौर्णिमानिमित्त ८ ऑगस्ट रोजी शासकीय कार्यालयांना जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे. त्याबरोबरच ज्येष्ठा गौरी विसर्जन निमित्ताने २ सप्टेंबर रोजी आणि नरक चतुर्दशीनिमित्ताने (अभ्यंगस्थान) २० ऑक्टोबर रोजी स्थानिक सुट्टी राहील. रत्नागिरी जिल्ह्यातील महसूल हद्दीमधील शासनाच्या सर्व खात्यांमधील कार्यालयांकरिता शासनाने जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्ट्यांव्यतिरिक्त ३ सार्वजनिक सुट्ट्या जाहीर करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहेत. त्या अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे.
---
सावर्डे महाविद्यालयात
कॉमर्स डे साजरा
सावर्डे ः कॉमर्स शाखा केवळ पुस्तकी शिक्षण नाही तर ती आर्थिक साक्षरता ते जागतिक बाजारपेठेत सहभागी होण्यापर्यंत एक सशक्त वाट असून, ती आधुनिक समाजाच्या आर्थिक विकासाचा कणा आहे, असे मत प्रा. पूजा आवले यांनी व्यक्त केले. सावर्डे येथील कला व विज्ञान महाविद्यालयातील कॉमर्स विभाग आयोजित ‘जागतिक कॉमर्स डे’ निमित्त त्या बोलत होत्या. या वेळी प्रा. जयसिंग चवरे यांचे कॉमर्स विभागप्रमुख प्रा. आवले यांनी स्वागत केले तर कॉमर्स विभागप्रमुख म्हणून नियुक्त झालेल्या प्रा. आवले यांचे स्वागत डॉ. दीप्ती शेंबेकर यांनी केले. या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. आवले म्हणाल्या, व्यापार, उद्योग, बँकिंग, विमा, लेखा व व्यवस्थापनसारख्या क्षेत्रांसाठी वाणिज्य शिक्षण अत्यंत उपयुक्त ठरत आहे. त्यामुळे सध्याच्या जागतिकीकरणाच्या युगात आर्थिक साक्षरतेचे महत्त्व वाढले असून, वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात आपले करियर आजमवले पाहिजे. या वेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्टार्टअप् इंटरप्रिनरशिप, डिजिटल पेमेंट सिस्टिम, इन्शुरन्स अँड टाइप्स इन्शुरन्स, एटीएम मशीन, इम्पॅक्ट ऑफ जीएसटी इन इंडियन इकॉनॉमी, बँक फॅसिलिटिज आणि रोल ऑफ ई-कॉमर्स इन मॉडर्न बिजनेस इत्यादी विषयांवरती सादरीकरण केले. या वेळी प्राचार्य टी. वाय. कांबळे उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. अवनी कदम यांनी केले तर आभार प्रा. माधुरी जाधव यांनी मानले.
------
कोंडिवरेत बँकेचा
ग्राहक मेळावा
सावर्डेः कोंडिवरे (ता. संगमेश्वर) येथील ग्रामपंचायत कार्यालयात रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे केंद्र शासन व बँक योजनांची माहिती देण्यासाठी ग्राहक मेळावा घेण्यात आला. बँकेचे शाखा निरीक्षक प्रतीक चव्हाण यांनी प्रधानमंत्री विमा योजना, अटल पेन्शन योजना, बिगरशेती कर्ज योजना, ग्रामीण व कृषी पर्यटन विकास योजना, ग्रामीण घरकूल गृहकर्ज योजना, शैक्षणिक कर्ज योजना, कॅश क्रेडिट योजना, मच्छीमार कर्ज योजना, शेती व शेतीपूरक व्यवसाय कर्ज योजना, दोन व चारचाकी वाहन खरेदी कर्ज योजना, पगारतारण कर्ज योजना, सहलीसाठी कर्ज योजना, ग्रामीण व शहरी वैयक्तीक कर्ज योजना, गणपती मूर्तिकारांना विशेष कर्ज योजना, डेअरी युनिट कर्ज योजना, विहीर बांधणी, पुनर्बांधणी, खोदाई व त्रिंबक सिंचनासाठी कर्ज योजना, स्थावर मालमत्ता तारण कर्ज योजना, कुक्कुटपालन व्यवसाय कर्ज, किसान क्रेडिट कार्ड योजना, विमा योजना व इतर शासकीय योजनांची माहिती दिली. या वेळी उपसरपंच जाकीर शेकासन उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tej Pratap Yadav : बिहार निवडणूक सुरू असतानाच केंद्र सरकारचा तेजप्रताप यादव बाबत मोठा निर्णय!

Kannad Election : उमेदवार शोधण्यासाठी राजकीय पक्षाची होतय दमछाक; कन्नडला अद्यापही युती, आघाडीसंदर्भात राजकीय पक्षांच्या हालचाली थंडच!

Bopodi Land Scam : बोपोडी जमीन व्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे; शीतल तेजवानीचे परदेशात पलायन?

Latest Marathi News Live Update : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

PMC Recruitment : पुणे महापालिकेतील कनिष्ठ अभियंता भरती प्रक्रिया निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT