कोकण

शासन योजनांसह दाखल्यांचा लाभ घ्या

CD

82506

शासन योजनांसह दाखल्यांचा लाभ घ्या

डॉ. विजय सूर्यवंशी ः बिबवण ग्रामपंचायतीमध्ये महसूल सप्ताह

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ६ ः आपल्या गावामध्ये योजनांपासून कुणी व्यक्ती वंचित राहू नये, यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे. ग्रामस्थांनी जागरुक राहून सर्व योजनांचा लाभ घेतला पाहिजे. महसूल सप्ताहात वारस नोंदी तसेच अनेक दाखल्यांचे वाटप सुरू असून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण विभाग आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी बिबवणे (ता.कुडाळ) ग्रामपंचायत येथे केले.
राज्यात महसूल दिनानिमित्त १ ते ७ ऑगस्टपर्यंत महसूल सप्ताह साजरा करण्यात येत आहे. महसूल विभागातर्फे या सप्ताहानिमित्त कोकण विभाग आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी आज बिबवणे ग्रामपंचायत येथे भेट दिली. जिल्हाधिकारी अनिल पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, कोकण विभाग अप्पर आयुक्त डॉ. माणिक दिवे, उपविभागीय अधिकारी (कुडाळ) ऐश्वर्या काळुशे, कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे, बिबवणे सरपंच सृष्टी कुडपकर आदी उपस्थित होते.
डॉ. सूर्यवंशी म्हणाले, ‘‘सरकारच्या विविध योजना आहेत. त्या योजनांपासून आपल्या गावातील कुणीही व्यक्ती वंचित राहू नये, यासाठी गाव पातळीवरील स्थानिक प्रतिनिधी व कर्मचाऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे. सर्व प्रकारच्या शासकीय योजना किंवा वैयक्तिक दाखल्यांचा लाभ ग्रामस्थांनी घ्यावा. याबाबत शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन घ्या. महसूल सप्ताह अंतर्गत वारस नोंदी, दाखले आदी सुविधांचा लाभ घ्या.’’
कुडाळ नायब तहसीलदार संजय गवस, निवासी नायब तहसीलदार प्रतापसिंह जाधव, ग्राम विस्तार अधिकारी संजय ओरोसकर, कुडाळ तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर, कसाल सरपंच राजन परब, पिंगुळी सरपंच अजय आकेरकर, रानबांबुळी सरपंच परशुराम परब, मंडल अधिकारी (पिंगुळी) गुरुनाथ गुरव, आरोग्य सेविका आय. एम. परब, प्राथमिक शाळा क्र. १ च्या मुख्याध्यापिका सोनाली दळवी, शिक्षक एकनाथ कुर्लेकर आदी उपस्थित होते. डॉ. सूर्यवंशी व मान्यवरांचे स्वागत सौ. काळुशे, तहसीलदार वसावे, सरपंच कुडपकर व पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी केले. आरोग्य सेवक प्रकाश तेडुलकर यांनी आभार मानले.
...................
पाच लाभार्थींना मंजुरी प्रमाणपत्र
याप्रसंगी विशेष सहाय्य योजनेतील नवीन मंजूर प्रकरणांमधील एकूण पाच लाभार्थ्यांना लाभ मंजुरी आदेश प्रमाणपत्र डॉ. सूर्यवंशी यांच्या हस्‍ते दिले. यात वैशाली बिबवणेकर (बिबवणे), मालती हरमलकर (झाराप), भारती भगत (आकेरी), सावित्री गावकर (झाराप), सुभद्रा घाटकर (साळगाव-घाटकरनगर) यांचा समावेश आहे. भगवान कोंडुरकर (बिबवणे) यांना विवाह नोंदणी प्रमाणपत्र दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : निजामाचं गॅझेट स्वीकारलं म्हणता मग तुम्ही इंग्रजांच्या परिवारातले आहात का ? मनोज जरांगेंना राग अनावर, जीभ घसरली?

Dussehra 2025: चक्क...या गावात होते रावणाची पूजा? काय आहे नेमकी परंपरा जाणून घेऊयात

Dussehra Melava 2025 Live Update: वणी येथे राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे संचलन व शस्त्रपूजन उत्साहात

Mangalwedha Farmers : स्वतःचे नुकसान बाजूला ठेवत सरकारलाच 15 रुपये मदतनिधी पाठवला

Latest Marathi News Live Update : शतंचडी यागास पुर्णाहूती व महाआरतीने वणी गडावर नवरात्रोत्सवाची सांगता...

SCROLL FOR NEXT